राजकीय
रिपब्लिकन सेनेची जिल्हा आढावा बैठक संपन्न

विविध पदाधिकाऱ्याचीं निवड
अक्कलकोट ( प्रतिनिधी ) रिपब्लिकन सेनेची जिल्हा आढावा बैठक महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी सदस्य सोलापूर जिल्हा निरीक्षक चंद्रकांत खंडाईत यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत तसेच रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष म्हणून मनोज सोनकांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच सोलापूर जिल्हा युवक महासचिव पदी प्रदीप बनसोडे याची नियुक्ती करण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी रत्नकांत गावडे यांची अध्यक्ष म्हणून तर दक्षिण सोलापूर महासचिव पदी आमीन नदाफ यांची निवड करण्यात आली. तसेच उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी प्रशांत मसलखांब यांचीही नियुक्ती करण्यात आली. सोलापूर शहर महासचिव म्हणून सुबोध सोनकांबळे यांची नियुक्ती करण्यात आली तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले चंद्रकांत खंडाईत व रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष किरण घोंगडे यांचा रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धार्थ कांबळे यांच्या वतीने त्यांना मानाचा फेटा निळेशाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी इतर सर्व उपस्थित यांचाही शाल व निळी टोपी तसेच पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. ही बैठक रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी या कार्यक्रमास रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा संघटक भारत नाना रणशृंगारे सोलापूर जिल्हा महासचिव राजशेखर चंदनशिवे शहराध्यक्ष रमेश अलकुंटे प्रभाकर गायकवाड शहर महा सचिव सुबोध सोनकांबळे तम्मा सोनकांबळे इत्यादी अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.