शैक्षणिक

विज्ञानाला ए.आय. तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज – डॉ‌.गणेश करे-पाटील

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा
करमाळा : ( प्रतिनिधी ) २८ फेब्रुवारी हा सी व्ही रामन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांमध्ये आय. क्यू. ए. सी. व विज्ञान विभागाच्या वतीने हा दिन साजरा करण्यात आला. विज्ञान दिनाचे औचित्य साधून यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश करे पाटील यांना कोलकाता येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कॉम्प्रिएन्सिव्ह अँड अल्टरनेटिव्ह थेरेपी आयआयसीएटी यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. गणेश करे पाटील यांनी विज्ञान दिनाची माहिती सांगून सध्याच्या काळामध्ये ए आय तंत्रज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालून जीवनाला सामोरे जाणे गरजेचे आहे. असे मत मांडले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी. माने हे होते. तसेच विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , आय.क्यू.ए.सी. चे सचिव डॉ. अंकुश करपे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख प्रा. विष्णु शिंदे यांनी, सूत्रसंचालन श्रीमती अनिता देशमुख यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. नितीन तळपाडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button