सोलापूर

तीव्र दुष्काळी स्थितीमुळे शिरवळचा धुबधुबी तलाव भरून देण्याची मागणी

 

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागात यावर्षी अतिशय जुजबी पाऊस झाला आहे ते खरीप पिके तग धरणे आणि प्रचंड वाढलेले गवत यासह हा पावसाळा संपत आला. अद्यापही जेऊर भागातील धुबधुबी तलाव कोरडे ठाक आहे. दिवाळी नंतर पाण्याची परिस्थिती गंभीर बनत जाणार आहे याचा विचार करून सध्या सुरु असलेले उजनीचे पाणी धुबधुबी तलावात तातडीने सोडण्याची कार्यवाही करून शेतकरी बांधवाना आणि पाणीपुरवठा योजनाना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी यांना भेटून दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी खासदार प्रणिती शिंदे, माजी गृहराज्यमंमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सिद्धेश्वर कारखाना अध्यक्ष धर्मराज काडादी,वळसंग सूत गिरणी चेअरमन राजशेखर शिवदारे,माजी जि.प सदस्य मल्लिकार्जुन पाटील,आनंद बुक्कानुरे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.यावर्षी पावसाळा अत्यल्प झाल्याने जेऊर व पंचक्रोशीतील गावासाठी वरदायीनी असलेले शिरवळ येथील धुबधुबी तलाव पावसाळा संपत आल्यावरही हा धुबधुबी प्रकल्प कोरडा ठाक असून या भागातील शेतकरी व गावकरी येत्या वर्ष भराच्या चिंतेने त्रस्त आहेत. याचा विचार करून पाणी सोडण्याची कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली आहे.शिरवळ धुबधुबी तलावातून जेऊर ता,अक्कलकोट या 12 हजार लोकवस्तीसाठी नियमित पाणीपुरवठा करणारी योजना या तलावातून आहे. तसेच शिरवळ,इंगळगी, कणबस, आहेरवाडी,करजगी,हंद्राळ,शावळ
यागावाचे सुद्धा पाणीपुरवठा आणि शेती योजन याच तलावावर अवलंबून आहेत.व या तलावाखाली अंदाजे १८ ते २० हजार खातेदार असलेले शेतकरी वर्ग आहेत.वरील सर्व शेतकरी व गावकर्यांचा पाण्याचा विचार करून या भागाचे हक्काचे पाणी शिरवळ ता,दक्षिण सोलापूर येथील
धुबधुबी तलाव येथे एकरुख सिंचन योजनेतून पाणी सोडण्यासाठी निवेदनद्वारे आग्रही मागणी करण्यात आली आहे.

चौकट : सध्या कुरनूर धरणात तुळजापूर तालुक्यातून मोठा पाण्याचा प्रवाह येत आहे. तो तूर्त कमी करून सुरुवातीला रामपूर तलाव भरून घेऊन तिथून हणमगांव तलाव भरून पाणी खाली सोडल्यास रस्त्यातील अनेक गावांची सोय होऊन धुबधुबी धरण भरून तिथल्या नागरिकांची अडचण दूर होऊन परिसरातील नागरिकांची चांगली सोय होऊ शकते यासाठी तातडीने पाणी सोडणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button