राजकीय

धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाचीच सत्ता आनणार : -सुजितसिंह ठाकूर

 

 शरद पवार / एकनाथ वायसे यांणा शेळगाव गटातून विजय करा : आमदार सुरेश धस 

परंडा / धाराशिव ( फारूक शेख )

धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाचाच झेंडा फडकून भाजपची सत्ता आननार आहे असा ठाम विश्वास भाजपाचे नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. परंडा तालुक्यातील शेळगाव गटात आज बुधवारी जिल्हा परिषदेचे भाजपा उमेदवार शरद रामदास पवार व पं स. गणातील उमेदवार एकनाथ वायसे यांच्या प्रचारार्थ भाजपा आमदार सुरेश धस व भाजपाचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची शेळगाव येथे जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. सुरेश धस यांनी शेळगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार शरद पवार व पंचायत समिती गणाचे उमेदवार एकनाथ वायसे यांना निवडणूकीत विजयी करा असे आवहान मतदारांना केले.

धाराशिव जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे असे मत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केले यावेळी गटातील उमेदवार शरद रामदास पवार गणातील, उमेदवार एकनाथ वायसे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ड संतोष सुर्यवंशी, अनिल

पाटीलृ, बाबासाहेब जाधव, ड. भालचंद्र औसरे, विलास खोसरे, विठ्ठल तिपाले आदिसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मतदार मोठया संख्येने उपस्थित होते .

पुढे बोलताना शेळगाव च्या कॉर्नर सभेत सुजितसिंह ठाकूर म्हणाले या ठिकाणचे प्रस्थापित पुढारी पक्षाशी प्रामाणिक न राहणारे, जनतेशी काय प्रामाणिक राहणार असा टोला सुभाषराव मोरे यांचे नाव न घेता लगावला, तर येत्या नऊ तारखेला भाजपाचे उमेदवार शरद पवार व एकनाथ वायसे हे तुमच्या आशीर्वादाने नक्कीच जिल्हा परिषदेचे व पंचायत समिती सदस्य होणार आहेत. शेळगाव गटात सर्वाधिक कामे भारतीय जनता पार्टीच्या काळात झाली आहेत असेही मा.आ. ठाकूर यांनी सांगितले व येत्या सात तारखेला शरद पवार व चिंचपूर गणातील पंचायत समितीचे उमेदवार एकनाथ वायसे यांना प्रचंड मताने निवडून द्या असे आवहा केले. शेळगाव गटात भाजपा, शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पंजा यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button