राजकीय
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मत सर्व्हेक्षणात आजी-माजी आमदारांमध्ये काट्याची टक्कर !
अक्कलकोट (प्रतिनिधी )सध्या सर्वत्र आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्या अनुषंगाने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात लोकांमधून मत सर्व्हेक्षण घेणे सुरू आहे. या मतं सर्व्हेक्षणात विद्यमान आमदारासह माजी मंत्री तथा माजी आमदार यांच्यात काट्याची टक्कर होणार अशी चिन्हे दिसत आहेत.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात प्रातिनिधीक स्वरूपात जनमानसाचा कौल घेण्याचे काम सुरू आहे. या मतं सर्वेक्षणात आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी मंत्री तथा माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे. मत सर्व्हेक्षणात एका अॅप द्वारे मतदारांचा कौल घेण्यात येत आहे. यामध्ये विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी छत्तीस टक्के तर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना 33 टक्के मते मिळाली आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना 18 टक्के मते मिळाली आहेत. आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार असून या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपा महायुतीचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात पुन्हा एकदा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी तयारी दोन्ही नेत्यांकडून सुरू आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून युवा नेते मल्लिकार्जुन पाटील ही इच्छुक आहेत. तसेच भाजपाकडून युवा नेते रमेश पाटील यांनीही तिकिटाच्या मागणीसाठी फिल्डिंग लावली आहे. एकूणच सर्वच राजकीय परिस्थिती पाहता अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर होणार आहे अशी चर्चा राजकीय जाणकारातून व्यक्त केली जात आहे .विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याचे दिसत आहे. अक्कलकोट विधानसभा मतदार संघात मत सर्वेक्षणात सध्या तरी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना थोडी अधिक पसंती असल्याचे दिसत आहे .तर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनाही मतदारांनी पसंती दिली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात फार मोठ्या मताचा फरक नसल्याचे मताच्या सर्वेक्षणात दिसत आहे. सध्या तरी आजी-माजी आमदार यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याची चिन्हे मतं सर्व्हेक्षणातून समोर येत आहे.



