राजकीय

सोलापूर झेडपीच्या अध्यक्ष शांभवी कल्याणशेट्टी होणार का ? अक्कलकोट विधानसभा क्षेत्रात चर्चा

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) नुकत्याच झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाले असून आता सोलापूर जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनेक सदस्यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा सुद्धा जोरदार सुरू आहे. यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार याकडे अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे 68 पैकी 38 जागा मिळवून भाजपने झेडपीवर वर्चस्व राखले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण अशी चर्चा ऐकण्यास मिळते.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या ठिकाणी पुरुष किंवा महिला यापैकी कोणीही अध्यक्ष होऊ शकतो. त्यामुळे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार, भाजपचे ज्येष्ठ नेते रामप्पा चिवडशेट्टी, बार्शीतील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मदन दराडे यांच्या पत्नी भारती दराडे यांची नावे सध्या चर्चेत येऊ लागली आहेत.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी या चपळगाव जिल्हा परिषद गटातून ७ हजार १५८ मताधिक्यानी विजयी झाल्या आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यासह विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे अक्कलकोट पंचायत समिती निवडणुकीत आठ जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने एक हाती सत्ता स्थापन केली आहे तसेच जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागे भारतीय जनता पार्टीने यश संपादन केले आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे राजकीय वजन पाहता सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी त्यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांची निवड होणार का याची जोरदार चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे अक्कलकोट तालुक्यासह विधानसभा क्षेत्रात ही शांभवी कल्याणशेट्टी या सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार का याकडे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला ३८ जागां मिळाल्या आहेत. यामध्ये बार्शीतून सहा, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सात, मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सहा, मंगळवेढा ४, पंढरपूर ३, माढा ४, दक्षिण विधानसभा ३ , माळशिरस २, करमाळा २ असे भाजपचे जिल्हा परिषदेमध्ये सदस्य निवडून आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता सध्या अक्कलकोटला जास्त महत्व आल्याचे दिसत आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टीसह भाजपाचे वरिष्ठ नेते सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत कोणता निर्णय घेणार याची चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button