डीपीडीसीमध्ये सुचविलेल्या कामांना मान्यता व निधी द्या ,खासदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : जिल्हा नियोजन समितीकडे सन 2025-26 मधून ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग, एमएसईबी डीपी, जनसुविधा व नागरी सुविधा अंतर्गत असणारी कामे, दलित वस्ती अंतर्गत कामे, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती व नवीन खोली बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, महानगरपालिका क्षेत्रामधील जिल्हास्तर नगरोत्थान अंतर्गत कामे, शहरातील अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधारणा योजनेतील कामे तसेच तीर्थक्षेत्र विकासाची कामे सुचवलेली आहेत. परंतु यापैकी एकाही कामाला मान्यता व निधी मिळाली नाही. तरी या कामांना तात्काळ मान्यता देऊन निधी देण्यात यावा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत खासदार प्रणिती शिंदे यांनी सादर केलेल्या यादीस मान्यता देण्यात येईल असे मुख्यमंत्री महोदय यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना सांगितले.



