क्राईम
अक्कलकोट तालुक्यातील कोन्हाळी गावात जातीवाचक शिवीगाळ करत कुऱ्हाडीने मारहाण , दहा जणा विरोधात अट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील मौजे कोन्हाळी गावात जातीवाचक शिवीगाळ करत कुऱ्हाडीने तसेच लोखंडी रॉड लाथाबुक्क्यानी मारहाण केल्या प्रकरणी दहा जणाविरोधात अट्रॉसिटी कायद्या अंतर्गत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.24/09/2024 रोजी सायंकाळी 07/30 वा.चे सुमारास लक्ष्मी देवीचे कट्याजवळ,कोन्हाळी, ता. अक्कलकोट येथे यातील फिर्यादी आदर्श आनंद गायकवाड ( वय २० ) यांने श्रीकांत परमेश्वर पाटील, गजानंद चंदप्पा दिंडुरे , दयानंद अप्पाराव पाटील , मल्लिनाथ पंडीत ढब्बे , मल्लिनाथ परमेश्वर पाटील , प्रकाश श्रीमंतराव पाटील , सिध्दाराम लक्ष्मण देसाई , श्रीशैल सिद्दाराम पाटील , सुदिप शिवपुत्र बिराजदार ,आप्पाराया मल्लिकार्जुन पाटील ( सर्व रा. कोन्हाळी )
या आरोपीतांना जातीवाचक स्टेट्स का ठेवले असे विचारले कारणावरुन आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन श्रीकांत परमेश्वर पाटील ,गजानंद चंदप्पा दिंडुरे यांना “तुम्ही जातावाचक स्टेटस का ठेवता” असे विचारलेचे कारणावरुन मल्लिनाथ पंडीत ढब्बे याने फिर्यादीचे चुलते प्रकाश निलकंठ गायकवाड यांना सदर ठिकाणी बोलावुन घेतले. त्यावेळी चुलता प्रकाश निलकंठ गायकवाड यांनी “काय झाले आहे? मला का बोलावले?” असे विचारलेवर मल्लिनाथ पंडीत ढब्बे याने फिर्यादीस उद्देशुन “तुम्हा महारांना खुप मस्ती आहे, यांना सोडु नका”. असे म्हणुन फिर्यादीचे चुलते प्रकाश निलकंठ गायकवाड यांचे पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी व विश्वजीत लक्ष्मण बनसोडे असे चुलते यांना मारु नका असे सांगत असताना मल्लिनाथ परमेश्वर पाटील याने फिर्यादीचे डावे हाताचे दंडावर लोखंडी रॉडने मारले व श्रीकांत परमेश्वर पाटील याने कुऱ्हाडीने डोकीत मारुन गंभीर जखमी केले आहे. गजानंद चंदप्पा दिंडुरे याने लाकडी काठीने ,दयानंद अप्पाराव पाटील व सिध्दाराम लक्ष्मण देसाई या दोघांनी हाताने व लाथाबुक्यांनी फिर्यादीस मारहाण केली आहे. फिर्यादीचे चुलते प्रकाश गायकवाड यांना श्रीशैल सिद्दाराम पाटील याने लोखंडी रॉडने डावे बरगडीवर मारुन जखमी केले आहे. तसेच प्रकाश श्रीमंतराव पाटील, सुदिप शिवपुत्र बिराजदार ,आप्पाराया मल्लिकार्जुन पाटील यांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली आहे. विश्वजित लक्ष्मण बनसोडे यास प्रकाश श्रीमंतराव पाटील , सिध्दाराम लक्ष्मण देसाई यांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली आहे. तेंव्हा फिर्यादी व इतर तेथुन पळुन जात असताना वरील सर्वांनी त्यांना शिवीगाळी, दमदाटी करत फिर्यादीचे चुलते प्रकाश निलकंठ गायकवाड यांचे मोटारसायकलवर दगड टाकुन मोटारसायकलचे नुकसान केले आहे व त्यांचे दिशेने दगडफेक केली आहे. याबाबतची फिर्याद उत्तर पोलीस ठाण्यात आदर्श आनंद गायकवाड यांनी दिली असून ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग अति.कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट विभाग हे करत आहेत.
