Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

इराणमध्ये युगांत! अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार; संपूर्ण कुटुंबही संपले

Admin by Admin
March 1, 2026
in देश - विदेश
0
इराणमध्ये युगांत! अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार; संपूर्ण कुटुंबही संपले
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तेहरान : पश्चिम आशियातील तणावाने आता भीषण वळण घेतले आहे. जगाला हादरवून टाकणाऱ्या एका कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या करण्यात आली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या थेट आणि अचूक हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

इराणमधील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी खामेनेई आपल्या कुटुंबासह असताना हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी खामेनेईंच्या हालचालींवर दीर्घकाळ लक्ष ठेवले होते. ज्यावेळी हल्ला झाला, तेव्हा खामेनेईंसोबत त्यांची मुलगी, जावई, सून आणि नातवंडेही उपस्थित होती. दुर्दैवाने या हल्ल्यात कोणीही जिवंत राहिले नाही.

या हल्ल्यात लहान बालकांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले असून, इराणच्या सत्तेचा केंद्रबिंदू असलेला हा वाडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे या घटनेची पुष्टी केली. इराणी जनतेला अखेर त्यांचे स्वातंत्र्य मिळाले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रॉयटर्सच्या अहवालानुसार, हल्ल्यानंतर घटनास्थळावरून खामेनेईंचा मृतदेह शोधून काढण्यात आला आणि त्याचे पुरावे ट्रम्प यांना सादर करण्यात आले.आयातुल्ला अली खामेनेई यांना वारंवार सत्ता सोडण्याचा इशारा दिला जात होता, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर अमेरिकेने हे पाऊल उचलले,” असे अमेरिकन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा; युद्धाचा भडका उडणार?

खामेनेईंच्या मृत्यूनंतर संपूर्ण इराणमध्ये शोककळा पसरली असून सरकारने ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मात्र, या दुःखाचे रूपांतर आता आक्रमकतेत होताना दिसत आहे. आम्ही आता शांत बसणार नाही, अमेरिकेला या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा इराणी लष्कराने दिला आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली असून, युद्धाची ठिणगी आता वणव्यात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Previous Post

बारामती विमान दुर्घटनेमागचे मोठे कारण समोर; AAIB च्या अहवालातून उघड झाली धक्कादायक माहिती

Next Post

परंडा येथे महावितरणचा विजेचा खांब टेंम्पोवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Admin

Admin

Next Post
परंडा येथे महावितरणचा विजेचा खांब टेंम्पोवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

परंडा येथे महावितरणचा विजेचा खांब टेंम्पोवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157237
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697