राजकीय
दुधनीचे नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
दुधनी नपा चा पदभार नुतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी दिनांक १३ जानेवारी रोजी मुख्याधिकारी तथा प्रशासक लक्ष्मीकांत कहार यांच्या हस्ते स्विकारला.
पदभार घेताच पहिल्या सभेत उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम झाला . उपनगराध्यक्ष पदी जिलानी चॉदसाब नाकेदार यांचा एकमेव अर्ज आल्याने अविरोध निवड झाली. स्विकृत सदस्या करिता उदयकुमार म्हेत्रे ‘ बसवराज हौदे यांचे अर्ज प्राप्त झाल्याने दोघांची निवड झाली .
याप्रसंगी प्रमुख उपस्थिति मध्ये शिवसेनेचे जिल्हयातील जेष्ठ नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे ‘ जेष्ठ नेते शंकर म्हेत्रे ‘ वैशाली म्हेत्रे ‘ आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे व सर्व नूतन सदस्याचीं भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीने नूतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे व सर्व सदस्यानी नगर परिषदेत प्रवेश केला.
या प्रसंगी दुधनी नगर परिषद नुतन नगरसेवक शिंदे शिवसेनेचे नगरसेवक व नगरसेविका अश्विनी हरळेकर ,श्रीदेवी कोळी , पवार हरिचंद्र,सरूबाई मळेकर ,मधुमती म्हेत्रे, सिद्धाराम येगदी,सुषमा धल्लू,, राऊफ निंबाळकर,सुनंदा चिंचोळी , बसवराज बसवनकेरी,संगीता पाटील, स्वाती सोळशे,अंजनाबाई पोलिस पाटील, ललिता गद्दी, सातलिंगप्पा परमशेट्टी, जगदेवी कोतली, महांतेश पाटील, संगमेश्वर सिन्नूर , बसवराज परमशेट्टी आदिचां मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थित नूतन नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष तसेच सर्व सदस्याचां माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे , शंकर म्हेत्रे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मल्लिनाथ म्हेत्रे , चाँद नाकेदार , संगमनाथ म्हेत्रे , रामा गद्दी ,विश्वनाथ म्हेत्रे, राजू परमशेट्टी , श्रीशैल म्हेत्रे ,चंद्रकांत येगदी , गुलाब खैराट , इंद्रजीत गद्दी , मल्लिनाथ कोटनूर , गुरु हबसी , राजू माळी शिवसेना शहर प्रमुख गुरुशांत ढंगे, शाकीर पटेल , पिरजादे आदींसह पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.



