सामाजिक

सुरताल संगीत महोत्सवात देशभरातील कलाकारांचे सादरीकरण

 

आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त कलाकारांच्या नृत्याविष्करांनी करमाळावासीय भारावले

करमाळा ( आयुब शेख )सुरताल संगीत विद्यालयाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त ११ व्या आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत महोत्सवाचे आयोजन करमाळा येथे करण्यात आले होते .या महोत्सवात देशभरातील अनेक कलाकारांनी सहभागी होऊन संगीत व नृत्य कला सादर केल्या. यामधे प .बंगाल, तेलंगणा, ओरिसा, आसाम, मध्य प्रदेश, गुवाहटी अशा अनेक राज्यातून आलेल्या कलाकारांनी आपली कला सादर केली .
या महोत्सवामध्ये सहभागी कलाकारांना संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रा.गणेश करे-पाटील यांनी कलाकारांना यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्राची ओळख असलेली पैठणी साडी भेट देऊन सन्मानित केले व आपल्या मनोगतमधून सुर-ताल संस्थेच्या कार्याबद्दल गौरोद्गार काढले.या कार्यक्रमाला
विद्या विकास मंडळाचे सचिव तथा जेष्ठ मार्गदर्शक विलासराव घुमरे , जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा.अध्यक्ष दिग्विजय दिगंबरराव बागल, यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, गिरधरदास देवी प्रतिष्ठानच्या सुनीता देवी,सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर, डॉ. कविता कांबळे, सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, सौ. संगीता खाटेर, नगरसेविका स्वाती ताई फंड आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांच्या हस्ते करण्यात आला.
गौरव करण्यात आलेले कलाकार व पुरस्कार :
डॉ. मोनिषा देवी गोस्वामी ,गुवाहाटी-सुरताल नृत्य साधना पुरस्कार,
गुरु इतिश्री पटनायक ,पुरी-सुरताल नृत्य शिरोमणी पुरस्कार , गुरु श्रुती पंडित,पुणे- सुरताल नृत्य भूषण पुरस्कार ,
गुरु सुचरिता घोष , हैदराबाद- सुरताल नृत्य कलाश्री पुरस्कार, *दिपनका शर्मा ,इंदौर- सुरताल नृत्य गौरव पुरस्कार,
अभिप्सा नंदी,कोलकाता- सुरताल कलानिधी पुरस्कार, प्रकाश शिंदे,पुणे- सुरताल वाद्य साधना पुरस्कार,
गितिमा दास ,गुवाहाटी- सुरताल कला गौरव पुरस्कार
डॉ. विथिका तिक्कु, जम्मू कश्मीर~सुरताल कलाभूषण पुरस्कार

सुर-ताल विशेष पुरस्काराचे मानकरी:

या महोत्सवाचे औचित्य साधत करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय योगपटू डॉ. राधिका तांबे-घोलप -आंतरराष्ट्रीय योगाचार्य पुरस्कार

प्राचार्य मिलिंद फंड~सुरताल संगीत रसिक पुरस्कार,

चित्रकार निवास कन्हेरे ~ सुरताल कला गौरव पुरस्कार,

पक्षीमित्र कल्याणराव साळुंके – सुरताल संगीत रसिक पुरस्कार,

संतोष जीवनलाल शियाळ -आदर्श व्यापारी सन्मान पुरस्कार

कार्यक्रमाचे संयोजन संस्थापक प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले
तर या आयोजनात यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे. श्री गिरिधरदास देवी प्रतिष्ठान, करमाळा. गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्था, करमाळा , कृष्णा हॉस्पिटल , करमाळा, दिगंबररावजी बागल पेट्रोलियम करमाळा यांनी सहयोगी संस्था म्हणून सहकार्य केले.

उपस्थित मान्यवरांचा सन्मान विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांच्या हस्ते करण्यात आला.

सूत्रसंचालन सौ रेशमा जाधव, सौ संध्या शिंदे , प्रा.विष्णु शिंदे तर आभार सौ अर्चना सोनी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ध्यान योग साधना व सेवा केंद्राचे सर्व सदस्य, संगीत विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .
कलाकार आणि विद्यार्थ्यांचे अप्रतिम सादरीकरणामुळे आलेले श्रोते आणी रसिक वर्ग मंत्रमुग्ध होऊन गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button