राजकीय
अक्कलकोटच्या उपनगराध्यक्षपदी संधी कोणाला मिळणार ! नागरिकात चर्चा

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट नगरीच्या उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार याकडे नागरिकांच्या नजरा लागले असून आता याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीत महिला सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आल्याने महिला सदस्यानां उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले आहे. अक्कलकोट नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी युवा नेते मिलन कल्याणशट्टी हे ८ हजार ५५३ मताधिक्याने विजयी झाले आहेत .या निवडणुकीत भाजपाला २५ पैकी २२ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये ११ महिला या एकट्या भाजपाकडून निवडून आले आहेत. अक्कलकोट शहरातील मतदाराने भाजपाला पसंती देत त्यांचे उमेदवार निवडून दिले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे .अक्कलकोट नगरीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी सदस्यातून निवड केली जाणार आहे. अक्कलकोट नगरीच्या उपनगराध्यक्षपदी नेमकी संधी कोणाला मिळणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भाजपकडून महिला सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आल्याने महिलेला उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळणार का याची चर्चा सुरू आहे .भाजपाकडून एकूण ११ महिला सदस्य निवडून आल्या असून यामध्ये सोनाली शिंदे या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. तसेच अल्फिया कोरबू या अल्पसंख्याक समाजातून असून त्यांना सर्वात मोठे मताधिक्य १ हजार २१ इतके मिळाले आहे. अल्फिया कोरबू या भाजपा अल्पसख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष ननू कोरबू यांच्या कन्या आहेत.तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे विश्वासू सहकारी नागराज कुंभार यांच्या पत्नी भागुबाई कुंभार या विजयी झाले आहेत. भागुबाई कुंभार या कुंभार समाजातून आहेत. तसेच स्नेहा खवळे , रेणुका राठोड , कस्तुरा चौगुले , मंजना कामुनूरकर , सुनंदा स्वामी ,अपर्णा सिद्धे ,शैला स्वामी या प्रथमच निवडून आले आहेत. महिलांसोबतच भाजपाकडून माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे ,महेश इंगळे ही मंडळी निवडून आल्याने यांचा नगर परिषदेतील प्रदीर्घ अनुभव पाहता यांना संधी मिळणार का हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. आमदार सचिन कल्याणशट्टी प्रथम महिला सदस्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देणार का पुरुष सदस्यांना देणार हे आगामी काळात दिसणार आहे .अक्कलकोट नगरी चा उपनगराध्यक्ष कोण याची चर्चा आता रंगली असून कोणाला संधी मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदासाठी सर्वांनीच बिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे.



