सोलापूर जिल्हा काँग्रेस (आय) महिला काॅंग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. सुवर्णा मलगोंडा यांची निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – सोलापूर जिल्हा काँग्रेस (आय) महिला काॅंग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. सुवर्णा मलगोंडा यांची निवड अखिल भारतीय महिला काॅंग्रेसच्या सरचिटणीस शिल्पी आरोरा यांनी पत्राद्वारे केली आहे.
डॉ. सुवर्णा मलगोंडा या अक्कलकोट नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. त्यांनी नगराध्यक्षा असतांना अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यांनी यापूर्वी जिल्हा महिला अध्यक्ष पदाची धुरा यशस्वी पणे सांभाळली आहे. त्या शहरातील नामांकित डाॅक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच त्या उत्तम संघटक आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षण राज्यमंत्री पार्वतीबाई मलगोंडा यांच्या त्या कन्या आहेत. ऐन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी पुर्वी त्यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह पसरला आहे. डाॅ. मलगोंडा यांची निवड झाल्याने भारताचे माजी गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार, वरीष्ठ उपाध्यक्ष अरुण जाधव, अशपाक बळोरगी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, बाळासाहेब शेळके, भिमाशंकर जमादार, ॲड. अर्जुन पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.



