राजकीय
माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांना स्वीकृत सदस्य पदी घेण्याची मागणी

अक्कलकोट (प्रतिनिधी) अक्कलकोट येथील माजी नगरसेवक ‘ भारतीय जनता पार्टीचे नेते उत्तम गायकवाड यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्याची मागणी अक्कलकोट शहरातील नागरिकांतून करण्यात येत आहे..आमदार सचिन कल्याणशेट्टी कोणता निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
माजी नगरसेवक उत्तम गायकवाड हे अक्कलकोट नगर परिषदेमध्ये सलग तीन वेळा विविध वार्डातून निवडून आले आहेत. तसेच त्यांच्या पत्नी सुवर्णा उत्तम गायकवाड याही प्रभाग क्रमांक सात मधून २०१६ -१७ साली नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.माजी नगरसेवक उत्तम गायकवाड हे २००१ साली खासबाग येथून प्रभाग क्रमांक एक मधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते . २००६ साली प्रभाग क्रमांक पाच मधून तर २०११ साली प्रभाग नऊ मधून अपक्ष म्हणून विजयी झाले होते . २०१६ -१७ साली प्रभाग क्रमांक सात मधून उत्तम गायकवाड यांच्या पत्नी सुवर्णा उत्तम गायकवाड या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या..माजी नगरसेवक उत्तम गायकवाड हे सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असून अक्कलकोट शहर व तालुक्यात आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अक्कलकोट शहर व तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.अक्कलकोट नगर परिषदेमध्ये वीस वर्ष नगरसेवक म्हणून त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्याची मागणी आता नागरिकांतून केली जात आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांच्या कन्या आरती गायकवाड यांना प्रभाग ११ मधून भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी देण्यात आली होती .पण आरती गायकवाड यांचा या ठिकाणी निसटता पराभव झाला आहे.गोरगरिबांची ,जनसामान्यांची कामे करणारा नेता अशी उत्तम गायकवाड यांची ओळख आहे.माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांनी आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष तसेच बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणून १९९० साली काम केले आहे.अक्कलकोट शहरातील भीम नगर जवळ मोठे बुद्ध विहार उभारणीचे काम उत्तम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांनी भीम नगर , बेडर गल्ली नाईकवाड गल्ली टिळक गल्ली महादेव नगर झोपडपट्टी आदीसह विविध भागात विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत.अक्कलकोट शहर व तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडचणीला धावून जाणारा नेता अशी ओळख असणाऱ्या माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे .आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उत्तम गायकवाड यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करून अक्कलकोट शहराच्या विकासासाठी संधी देण्याची मागणी करण्यात येत आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी कोणता निर्णय घेणार याकडे अक्कलकोट शहर व तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चौकट –
अक्कलकोट शहर व तालुक्यात २००१ पासून सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. शहरातील प्रभागाच्या माध्यमातून जनतेची सेवा केलेली आहे. या पुढील काळात ही जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करत राहू. कोरोना काळात माझ्या वार्डातील प्रभागातील माता भगिनींना , नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. एक निस्वार्थी भावनेने सामाजिक बांधिलकी म्हणून काम केले आहे. तालुक्यातील आंबेडकरी चळवळ जिवंत राहील या दृष्टीने काम करू. अक्कलकोट तालुक्याचे विकासरत्न आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळात काम करत राहू.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे. येणाऱ्या काळात आमदार कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली विकासासाठी पाठपुरावा करणार .राजकारणात हारजीत होत असते .शेवटी जनता मतदार हेच मायबाप आहेत. मतदारांचा कौल मान्य असून या पुढील काळात जनसेवेसाठी झटत राहणार.
उत्तम गायकवाड , माजी नगरसेवक अक्कलकोट



