Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महापालिका निवडणुकीसाठी नयना गुंडे मुख्य निवडणूक निरीक्षक

Admin by Admin
January 2, 2026
in सोलापूर
0
महापालिका निवडणुकीसाठी नयना गुंडे मुख्य निवडणूक निरीक्षक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करीता मुख्य निवडणूक निरीक्षक व निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

सोलापूर ( रमेश सुरवसे ): सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगामार्फत मुख्य निवडणूक निरीक्षक तसेच निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने नयना गुंडे, आयुक्त, महिला व बाल विकास विभाग, पुणे – यांची सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच मा. श्री. मल्लिकार्जून माने, अपर जिल्हाधिकारी, सातारा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.

निवडणूक प्रक्रिये दरम्यान आचारसंहितेचे पालन, निवडणूक कामकाजातील पारदर्शकता तसेच निष्पक्ष व निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्याच्या दृष्टीने हे निरीक्षक कामकाज पाहणार आहेत.निवडणूक संदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी, हरकती किंवा सूचना असल्यास नागरिकांनी त्याबाबत मुख्य निवडणूक निरीक्षक अथवा निवडणूक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. दोन्ही निरीक्षक शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे वास्तव्यास असून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी तेथे उपलब्ध असतील.सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग कटिबद्ध असून नागरिकांनी निर्भयपणे आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Previous Post

माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांना स्वीकृत  सदस्य पदी घेण्याची मागणी 

Next Post

पंडीत. भिमण्णा जाधव व  गुंडम्मा जाधव यांनी उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला

Admin

Admin

Next Post
पंडीत. भिमण्णा जाधव व  गुंडम्मा जाधव यांनी उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला

पंडीत. भिमण्णा जाधव व  गुंडम्मा जाधव यांनी उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157263
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697