धार्मिक
श्री वटवृक्ष देवस्थान ट्रस्टने आध्यात्मासह सामाजिक, शैक्षणिक कार्याला दिलेलं प्राधान्य कौतुकास्पद – सुषमाताई अंधारे

शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा वटवृक्ष देवस्थान कार्यालयात सत्कार
अक्कलकोट ( प्रतिनिधी)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ट्रस्टने आध्यात्मासह सामाजिक, शैक्षणिक कार्याला दिलेलं प्राधान्य कौतुकास्पद असल्याचे मनोगत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या तसेच जिल्हा संपर्क प्रमुख सुषमाताई अंधारे यांनी व्यक्त केले.
आज जिल्हा संपर्क प्रमुख सुषमाताई अंधारे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशैल गवंडी यांनी सुषमाताई अंधारे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी सुषमाताई अंधारे बोलत होत्या.
पुढे बोलताना सुषमाताई अंधारे म्हणाल्या की वटवृक्ष देवस्थान समितीचे कार्य अतिशय स्वच्छ, शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने चालवले जाते. भाविकांसाठी असलेल्या सर्व सोयी-सुविधा पाहून मनाला समाधान मिळाले आहे. अशा देवस्थानांमुळे आपला सांस्कृतिक वारसा जपला जातो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात त्यांच्या समोर माझा सत्कार सोहळा संपन्न झाल्याने खूप बरे वाटले असे सांगून मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पुरुष व महिला भगिनी पदाधिकारी जिल्हा प्रमुख शरणराज केंगनाळकर, उमेश सारंग, संजय पोळ, हुकूमचंद राठोड, दत्ता माने, रमेश चौगुले, रवी डोके, सोपानकाका निक्ते, अयाज जमादार, मनोज पवार, गुरुलिंगप्पा पाटील, रवी कोळी, पिंटू पांढरे, राम जाधव, भिम जाधव, राजशेखर गुरव, संतोष पाटील संतोष टोणपे, महेश फुलारी तसेच सचिव आत्माराम घाटगे, सागर गोंडाळ, रमेश शिंदे , सचिन हन्नूरे आदींसह स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




