सामाजिक

दहिटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर कांबळे बिनविरोध यांची निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यातील  दहिटणे येथे गुरुवारी उपसरपंच पदाची निवड करण्यात आली.दहिटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर कांबळे बिनविरोध यांची निवड करण्यात आली.
 यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच नितीन  मोरे हे उपस्थित होते. दहिटणे गावात सरपंच झाल्यापासून संकल्प केला होता की प्रत्येक वर्षी एक उपसरपंच निवड करून सगळ्याला पदाचा मान मिळावा. या संकल्पनेतून सरपंच नितीन  मोरे यांनी २०२३ पासून आज पर्यंत तीन उपसरपंच करून सदस्यांना मान दिला आहे. दहिटणे गाव विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना सरपंच म्हणाले की आमच्या पाठीशी अक्कलकोट तालुक्याचे  विकास रत्न लोकप्रिय आमदार सचिन  कल्याणशेट्टी असल्याने आज पर्यंत गावाला दोन कोटीच्या आसपास निधी आला आहे. इतका विकासासाठी निधी आजपर्यंत कोणीही गावासाठी आणलेला नसून हे सरपंच मोरे यांच्यामुळे शक्य झाले आहे दरवर्षी ठरल्याप्रमाणे पाच नोव्हेंबरला राजीनामा देऊन नवीन उपसरपंचाची निवड होते. त्याच अनुषंगाने आज दहिटणे ग्रामपंचायतच्या नूतन उपसरपंच पदी सागर कांबळे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी मावळते उपसरपंच शरणू कोळशेट्टी , ग्रामपंचायत सदस्य अंबुताई कटकधोंड , शहनाज  मुजावर , दादा शेख , विकी बाबा चौधरी सत्यवती  कोळी ,लोचनाबाई जाधव , गोपाळ शिरसागर ,चंद्रकला कांबळे एकूण ११ पैकी दहा सदस्य उपस्थित राहिल्याने असल्याने ही निवड पूर्णता शासनाच्या कोरमनुसार पूर्णपणे झाली आहे असे निवडणूक अधिकारी इंगळे यांनी सांगितले.  या कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी मोठ्या प्रमाणात आले होते. याप्रसंगी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अरुण पोपस्भट , पोलीस पाटील भीम म्हेत्रे , पंडित मोरे , श्याम शिंदे , राजेंद्र मोरे , श्रीकांत चौधरी , मधुकर मोरे दत्ता  गजाकोस ,बळी  गजाकोस ,धनाजी कांबळे , तम्मा चौधरी , ज्ञानेश्वर गरडे ,आनंद मोरे , दयानंद राजेगावकर ,सनी नारायणकर , देवराव बंदीछोडे , योगेश मोरे , प्रकाश भगळे , सिद्धू  बगळे ,अजित सोनकांबळे ,जाकी गायकवाड , ताहीर शेख सह इतर मान्यवर युवक मंडळी ,महिला मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित उपसरपंच सागर कांबळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button