सोलापूर
महात्मा फुले जन्म द्विशताब्दीनिमित्त गुरूवारी, “जावेद पाशा” यांचे व्याख्यान
प्रबोधनपर्वाचे पाचवे पुष्प!
सोलापूर ( रमेश सुरवसे )थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्त प्रबोधनपर्व उपक्रमात उद्या गुरुवारी, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफले जाणार आहे. नागपुरातील साहित्यक व सामाजिक कार्यकर्ते जावेद पाशा कुरेशी यांचे व्याख्यान होईल. त्यांच्या व्याख्यानाचा विषय महात्मा फुले आणि बहुजन समाज आहे.
सदर कार्यक्रम डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे भूषवणार आहेत,
सोलापूरकरांनी प्रबोधनाच्या या प्रबोधन जागरात सामील व्हावे, असे आवाहन महात्मा फुले जन्म द्विशताब्दी संयोजन समितीने केले आहे.



