धार्मिक
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून गुरुवारी प्रस्थान

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून गुरुवारी प्रस्थान झाली. सदरचा हा सोहळा न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २९ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा काढण्यात येत आहे, यंदाचे ३० वे वर्ष असून, या परिक्रमेचा शुभारंभ श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक महेश इंगळे, देवस्थानचे पुरोहित मंदार मोहनराव पुजारी आणि श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अण्णू महाराज पुजारी, धनंजय पुजारी, कु.मोहित पुजारी, कु.चैतन्य शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ पादुकाच्या पूजनाने करण्यात आले.
दरम्यान न्यासाच्या महानैवद्याबरोबर अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी श्रींचे पादुकासह श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महानैवद्य पूजा संपन्न झाली. याप्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक महेश इंगळे, देवस्थानचे पुरोहित मंदार मोहनराव पुजारी आणि श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अण्णू महाराज पुजारी, धनंजय पुजारी, व्यंकटेश पुजारी, कु.मोहित पुजारी, कु.चैतन्य शेठ हे उपस्थित होते.
महाप्रसादालयात पालखी पुजानंतर न्यासाच्या परिसरात असलेल्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर व श्री भवानी माता मंदिर येथे पालखी पूजन करून, अन्नछात्रातून राजे फत्तेसिंह चौक, सर्जेराव जाधव पथ, सोन्यामारुती चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड, कारंजा चौक, बुधवार पेठेतील समाधी मठ येथे आरती, श्री मल्लिकार्जुन मंदिर, शिवछत्रपती, शिवाजी महाराज चौक (बस स्थानक) येथील श्री खंडोबा मंदिरातील आरती नंतर सोलापूरकडे पालखी मार्गस्थ झाली. दिनांक १२ नोव्हेंबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील सोहाळे येथे मुक्काम तर शनिवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी पालखी सांगली जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
या पालखी प्रस्थान सोहळ्यास न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, कु.हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु.समर्थ संदिप फुगे, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे,प्रा.सायबण्णा जाधव, विश्वस्त व पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे,नितीन शिंदे, माजी नगरसेवक चंद्रकांत बोदले, शिव बोदले, सिद्धेश्वर मोरे, सनी सोनटक्के, प्रवीण देशमुख, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, पालखी पुरोहीत संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी, रोहन शिर्के, आकाश गडकरी, प्रशांत शिंदे-साठे, शिवा मंगरुळे, योगेश पवार, अतिश पवार , विनायक भोसले, बाळासाहेब कुलकर्णी-बबलादकर-देसाई, सिद्धाराम कल्याणी, अप्पा हंचाटे, मैनुद्दीन कोरबू, सर्फराज शेख, निखील पाटील, प्रविण घाटगे, गोटू माने,अमर पाटील, योगेश लोकापूरे,प्रसाद शिंदे,रोहीत खोबरे, सौरभ मोरे यांच्यासह भक्तगण सेवेकरी, वारकरी, कर्मचारी आदीजण उपस्थित होते. अक्कलकोट शहरात विविध ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रातील गावोगाव असलेल्या स्वामी भक्तांना करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे येता येत नांही, अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येत आहेत. असे नियोजन ह्या परिक्रमेच्या माध्यमातून होत आहे. श्री समर्थ स्वामींच्या साधू-संतांची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षापासून उभ्या भारतभर पसरत आहे. स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येऊन तद्वत त्यांच्या भक्तींची लौकिक आणि अलौकिक अनुभूती येऊन त्यांचे जिवन संपन्न बनत आहे. श्री स्वामी समर्थांची पालखी आपल्या गावी येत आहे. या योगे श्री स्वामी चरणी तन-मन-धनाने निष्ठा व सेवा अर्पण करण्याची ही अपूर्व संधी भक्तांना प्राप्त होत आहे.
चौकट : –
सन २०२६-२७ मध्ये ८ महिने पालखी :
- गेल्या २९ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे मुक्काम तर गोवा राज्यातील २ जिल्ह्यात मुक्काम पालखीचा असतो. याबरोबरच बृहन मुंबई, ठाणे, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या महानगरा बरोबरच सांगली, कोल्हापूर, सिधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, नाशिक धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, बुलाढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, नांदेड, अ.नगर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यातून परिक्रमा होत असून विशेष म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ राज्यासह गडचिरोली शहर व परदेशातून देखील मागणी होत आहे. पालखी परिक्रमेच्या अधिक माहितीसाठी मुख्य संयोजक संतोष भोसले-९८२२८१०९६६, ८५५८८५५६७५ यांना संपर्क करण्याचे आवाहन न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले आहे. सदर पालखी परिक्रमा ही ८ महिने महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह दिनांक ७ जुलै २०२७ रोजी तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत विसावणार आहे.



