वडील DCC वर तर मुलं आता केडरवर ; रणवीर राऊत, प्रणव परिचारक, मदन पाटील बिनविरोध

आवताडेही बिनविरोधच्या मार्गावर; केडरसाठी 102 उमेदवारांचे अर्ज
सोलापूर – सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था (केडर) च्या संचालक मंडळाच्या 16 जागांकरीता गुरूवारी शेवटच्या दिवसापर्यंत 102 उमेदवारांनी 109 अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वसाधारण बार्शी तालुका प्रतिनिधी मतदारसंघातून आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत, पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक, मोहोळमधून मदन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. तिन्ही मतदारसंघात या तिघांचे एकेकच अर्ज दाखल झाले आहेत. याच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. तसेच मंगळवेढा मतदारसंघातून बबनराव आवताडे व त्यांचे पुत्र सिध्देश्वर व सुशील आवताडे या तिघांचेच अर्ज दाखल झाल्याने येथील निवडही बिनविरोधच्याच मार्गावर आहे.
यातील सिध्देश्वर आवताडे यांची जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे केडरसाठी आता बबनराव आवताडे की सुशील आवताडे यांचा अर्ज कायम राहणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, दाखल अर्जांची छाननी उद्या (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात करण्यात येणार आहे. 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 8 डिसेंबर रोजी चिन्हवाटप होणार असून 20 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल, तर 21 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी 1206 मतदार पात्र आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक आबासाहेब गावडे हे काम पाहत आहेत.
मतदारसंघनिहाय दाखल उमेदवार पुढीलप्रमाणे.
सर्वसाधारण 11 जागा –
अक्कलकोट : मिलन कल्याणशेट्टी, शिवानंद पाटील एकूण 2 उमेदवार
बार्शी : रणवीर राऊत एकूण 1 उमेदवार
करमाळा : जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, सुभाष गुळवे, बबन मेहेर एकूण 4 उमेदवार
माळशिरस : धैर्यशील मोहिते-पाटील, संग्रामसिंह जहागीरदार, सुरेश पाटील, मनोज शेळके, किरण शिंदे एकूण 5 उमेदवार
माढा : संजयमामा शिंदे, सतीश केचे, रणजित शिंदे, सुरेश पाटील, प्रतापसिंह पाटील, ज्ञानदेव टोणपे एकूण 6 उमेदवार
मंगळवेढा : बबनराव आवताडे, सिध्देश्वर आवताडे, सुशील आवताडे एकूण 3 उमेदवार
मोहोळ: मदन पाटील एकूण 1 उमेदवार
पंढरपूर : प्रणव परिचारक एकूण 1 उमेदवार
सांगोला : पोपट गडदे, भाऊसाहेब खटकाळे, विजय येलपले, सुभाष पाटील, सोमनाथ गोडसे, संतोष देवकते, दादासाहेब बाबर, विजय पवार, संतोष पवार एकूण 9 उमेदवार
उत्तर सोलापूर : दिलीप माने, चंद्रकांत म्हेत्रे, तुकाराम गुंड, सिध्दाराम चाकोते एकूण 4 उमेदवार
दक्षिण सोलापूर : सुरेश हसापुरे, श्रीदीप हसापुरे, नागप्पा बनसोडे, इंदुमती अलगोंडा एकूण 4 उमेदवार
महिला राखीव 2 जागा –
सवितादेवी राजेभोसले, इंदुमती अलगोंडा, प्रियांका भगत, मनीषा रणे, माधुरी मोरे, महादेवी कोगनूर, पल्लवी घोडके, भारती भोंग, सविता गायकवाड, रोहिणी मोरे, अश्विनी बादल, सुवर्णा दळवे, सुवर्णा सुरवसे, अर्चना शिंदे, सुनीता खुने, विणा जोकारे, सुप्रिया सुरवसे एकूण 17 उमेदवार
अनुसूचित जाती/जमाती 1 जागा –
नानासाहेब नाईकनवरे, नागनाथ रणशूर, लक्ष्मण धनवडे, विशाल जाधव, येदा दुपारगुडे, वैशाली कापुरे, हरिश्चंद्र साळवे, तानाजी गायकवाड, संदीप ठाकरे एकूण 9 उमेदवार
भटक्या विमुक्त जाती/जमाती 1 जागा –
दादासाहेब शिंगाडे, महेंद्र खटके, पोपट गडदे, नागप्पा बनसोडे, हनुमंत पाटील, प्रथमेश पाटील, सतीश सोनटकले, भाग्यवंत तरंगे, मोतीलाल राठोड, तानाजी वाघमोडे, हणमंत मासाळ, संतोष देवकते, अशोक येडगे, बिरमल कोळी, हणमंतराव बुरले, बनसिध्द बन्ने, भाऊसाहेब बुधवंत एकूण 17 उमेदवार
इतर मागासवर्गीय 1 जागा –
देवीदास ढोपे, सिध्देश्वर आवताडे, वैभव कुटे, गोपाळ शेळके, शिवानंद पाटील, यशवंत धोंगडे, विजयकुमार माळी, जमीर सुतार, काशीनाथ गौडगुंडे, महेश सगरे, सुजित बागल, सुभाष गुळवे, रामचंद्र बनकर, नागनाथ झुंजारे, विनोद माने, अविनाश मार्तंडे, श्रीदीप हसापुरे, सुरेश हसापुरे, बबन मेहेर एकूण 19 उमेदवार



