राजकीय

आमदार कल्याणशेट्टी यांचे सहकार क्षेत्रातही वर्चस्व सिद्ध !

 

सोलापूर डिसीसी बँकेच्या संचालकपदी निवडीने  सहकार क्षेत्रात नव्या अध्यायाला सुरुवात
अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली असून यामुळे अक्कलकोट तालुक्यातील सहकार क्षेत्रातील समीकरणे झपाट्याने बदलली जाणार आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सहकार क्षेत्रातील प्रवेश हा सहकार क्षेत्राला ऊर्जा देणाऱ्या ठरणार आहे. सोलापूर डीसीसी बँकेतील संचालक पदामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे राजकीय आणि सहकार क्षेत्रातील ताकद वाढली आहे. तसेच विरोधकांनाही यातून धडा मिळाला आहे.
 आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सोसायटी मतदारसंघातून सोलापूर डीसीसी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उभे होते. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधात अक्कलकोट पंचायत समितीचे माजी सभापती संजीवकुमार पाटील व विश्वेश्वर नागूर उभे होते .अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी संजीवकुमार पाटील व विश्वेश्वर नागुर यांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर डीसीसी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली. राजकीय क्षेत्रात काम करताना सहकार क्षेत्रात ही वर्चस्व सिद्ध करावे लागते. या अगोदर माजी आमदार स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील तसेच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सोलापूर डीसीसी बँकेत संचालक म्हणून काम केले आहे. एक रेकॉर्ड माजी आमदार स्वर्गीय सिद्रामप्पा पाटील यांनी निर्माण केला आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही सोलापूर डीसीसी बँकेचे संचालक म्हणून काम केले आहे.आता आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या रूपाने अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातून सोलापूर डीसीसी बँकेवर संचालक म्हणून संधी मिळणारे लोकप्रतिनिधी ठरले आहेत. राजकीय क्षेत्रात यशस्वी होत असताना आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सहकार क्षेत्रात पदार्पण केल्याने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी याचा फायदा होणार आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना तसेच सोसायट्याना  न्याय मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची राजकीय ताकद वाढली असून आता सहकार क्षेत्रातील त्यांची ताकद वाढणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या डीसीसीतील विजयामुळे विरोधकांनाही आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सोलापूर डीसीसी बँकेतील विजयामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात जल्लोष करण्यात येत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर डीसीसी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याने आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी राजकीय क्षेत्रासह सहकार क्षेत्रातही आपले वर्चस्व सिद्ध केले असून आता सहकार क्षेत्रात नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button