धार्मिक

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये दीपावली निमित्त पहाटगाणी व अभंग संध्येचे आयोजन – चेअरमन महेश  इंगळे

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
         लक्ष लक्ष दिव्यांच्या नजराण्याची आस मनी बाळगून दीपावलीच्या पावन पर्वावर सालाबादा प्रमाणे यंदाही येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात पहाटगाणी व अभंग संद्येचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश  इंगळे यांनी दिली.
         यामध्ये रविवार दिनांक ८, ९, ११ नोव्हेंबर रोजी अक्कलकोटचे गुरुवर्य वेदशास्त्र संपन्न मनोहर व्यंकटेश देगांवकर आणि ज्योतिष शास्त्री 
डॉ.संतोष व्यंकटेश देगांवकर यांची पहाटे ५.१५ ते सकाळी ८.०० यावेळेत शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सेवा (पहाटगाणी)
व दिनांक ९, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.१५ ते सायंकाळी ७.३० यावेळेत सुमधूर भावमय स्वरांजली ही अभंग संद्या संपन्न होईल.
        मंगळवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पहाटे ५.३० ते सकाळी ७.३० या वेळेत सोलापूर येथील स्वरध्यास संगीत विद्यालय प्रस्तुत प्रमुख गायिका रसिका – सानिका कुलकर्णी यांच्या सादरी करणातून व सहकलाकार अक्षय भडंगे,
यश जवळकर, अभिषेक परदेशी यांच्या साथ संगतीतून (दिवाळी पहाट) हा पहाट गाण्यांचा कार्यक्रम संपन्न होईल. ही सर्व सेवा व धार्मिक कार्यक्रम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात नियोजीत तारखेस व वेळेवर देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होतील. या माध्यमातून पहाटेच्या प्रसन्न वेळेत स्वामींच्या दरबारात शास्त्रीय सुरांची अनुभूती भाविकांना घेता येणार आहे. ही दीपावली आपणा सर्वांना सुख समृद्धीची व भरभराटीची जावो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना असल्याचे मंदीर समितीने जाहीर केले आहे. यावेळी प्रथमेश  इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button