राजकीय
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधातील अपमानास्पद वक्तव्याचा भाजपकडून तीव्र निषेध

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री . जयकुमार गोरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह, बेजबाबदार आणि अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी अक्कलकोट येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
लोकशाहीत मतभेद असणे स्वाभाविक आहे; मात्र राजकीय टीकेच्या नावाखाली वैयक्तिक पातळीवर अशोभनीय आणि अवमानकारक भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारी बाब नाही. अशा पातळीवरील वक्तव्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. सभ्य राजकारणाची मर्यादा ओलांडणाऱ्यांना जनता लोकशाही मार्गाने योग्य उत्तर देईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी , महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवशरण जोजन, मध्य मंडल अध्यक्ष . प्रदीप पाटील, पंचायत समिती उपसभापती . सागर कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष . ऋतुराज राठोड, पंचायत समिती सदस्य अप्पासाहेब किवडे, नगरसेवक प्रविण शहा, . नावेद ढांगे, सद्दाम शेरीकर, भीमराव शेळके, अशोक जाधव,. सुनिल सिध्दे,. प्रथमेश इंगळे, शिवशंकर स्वामी, सौ. विजया गंवडी,. रुद्रया स्वामी, . शैलेश राठोड,. प्रितीश किलजे, उदय नरेगल, सागर डिगे, अक्षय तारापुरे, मेघराज घुलगे,. लक्ष्मण इंडी,. शिवानंद पतरगी,. गोरीशंकर स्वामी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



