नरसी येथील संगमेश्वर ट्रेंडिंग कंपनी जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाला नियमाचे उल्लंघन

नायगाव / नांदेड (- सय्यद अजीम नरसीकर )सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांची होत असलेली 2 किलो कट्टीची लूट थांबविण्याबाबत व 50 किलो 800 ग्रॅमची योग्य भरती पद्धत लागू करण्याबाबत. व जूट बारदाना मध्ये सर्व जिल्हाभर एकाच पद्धतीची खरेदी व्हावी खरेदी करण्यात यावी.सविनय निवेदन असे की, सध्या महाराष्ट्रात व विशेषतः नांदेड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कसेबसे सोयाबीनचे पीक हाती आले आहे.
परंतु नरसी येथील संगमेश्वर ट्रेंडिंग कंपनी व्यापारी हे सोयाबीन खरेदी करताना शेतकऱ्यांची उघड फसवणूक करीत आहेत.
*फसवणुकीचा प्रकार असा आहे :-*
नियमाप्रमाणे बारदाना सह 50 किलो 800 ग्राम सोयाबीनमागे अपेक्षित आहे.आसे जिल्हा उपनिबंधक यांच्या अदेश आहे तरी जिल्हा उपनिबंधक यांच्या अदेशाला नियमाचे उल्लंघन केले आहेत.
परंतु प्रत्यक्षात नरसी येथील संगमेश्वर ट्रेंडिंग कंपनी व्यापारी 52 किलोच्या भरतीवर 2 किलो कट्टी लावत असून 52 किलो 200 ग्रॅम असा काटा करून शेतकऱ्यांकडून माल घेत आहेत. यामुळे प्रत्येक पोत्यामागे शेतकऱ्याचे जवळपास 2 किलो सोयाबीनचे नुकसान होत असून, मोठा आर्थिक फटका बसत आहे.
दुष्काळात आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यासाठी हे मोठे आर्थिक नुकसान आहे.आपण तात्काळ जिल्हा उपनिबंधक, नांदेड यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना लेखी आदेश निर्गमित केले. आहे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची 2 किलोची बेकायदेशीर कट्टी घेतली जाणार नाही, फक्त 50 किलो 800ग्रॅमचीच वैध भरती घेतली जाईल असे सक्त आदेश काढले.आहेत तरी नरसी येथील संगमेश्वर ट्रेंडिंग कंपनी व्यापारी आडत दुकान दार नियमाचे उल्लंघन कले आहे. त्याच्यावर बाजार समिती अधिनियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करावी.आसे नरसी व नरसी परीसरात शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.



