राजकीय

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूकसाठी  आमदार . सचिन  कल्याणशेट्टी  यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर ( प्रतिनिधी )
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत विविध कार्यकारी सोसायटी ‘अ’ (खुला प्रवर्ग) या गटातून  आमदार  सचिन  कल्याणशेट्टी यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज गुरुवारी  अत्यंत उत्साही व विश्वासपूर्ण वातावरणात दाखल करण्यात आला.
शेतकऱ्यांचे हित आणि सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त करत हा उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.
या वेळी सूचक म्हणून  शिवनिंगप्पा अरवत, तर अनुमोदक म्हणून सौ. कविता अशोक शिंदे उपस्थित होत्या.
याप्रसंगी    अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी , माजी जिल्हा परिषद सदस्य  रामचंद्र अरवत, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य  विश्वनाथ नागुर,  ओंकारप्पा हारकुड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, सहकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button