शैक्षणिक

योगेश कबाडे यांची मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याधापक पदी निवड 

 अक्कलकोट ( प्रतिनिधी )
येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी शनिवार दिनांक १/८/२०२६ पासून पदोन्नतीने योगेश कबाडे यांची नियुक्ती करण्यात आली. मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेचे मुख्याध्यापक आर.एस. पडवळकर यांची मराठा मंदिर निर्मलराजे कन्या प्रशालेत बदलीने नियुक्ती झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर योगेश कबाडे यांची नियुक्ती करण्यात आली. योगेश कबाडे हे शहाजी प्रशालेमध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. सेवा ज्येष्ठतेने त्यांची नियुक्ती मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात १८८८ साली स्थापना झालेल्या मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेला फार मोठी परंपरा आहे. मराठा मंदिर संस्थेच्या सन्माननीय पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली दिवंगत माजी मुख्याध्यापक गोगी सर यांनी घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार प्रशाला आजपर्यंतच्या मुख्याध्यापकांनी यशस्वीरीत्या चालवली आहे. या १३९ वर्षात  हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन यशस्वी झाले आहेत. मराठा मंदिर संस्थेच्या महाराष्ट्रात  अक्कलकोट जिल्हा सोलापूर, जत  जिल्हा सांगली, पाली, रत्नागिरी, जिल्हा रत्नागिरी, मुंबई येथे शाळा आहेत. नूतन मुख्याधापक योगेश कबाडे यांनी सहशिक्षक म्हणून २६ वर्षे व पर्यवेक्षक म्हणून वर्षभर काम केले आहे. योगेश कबाडे यांनी ब्रिटीश कौन्सिल मेंटॉर, स्पोकन इंग्रजी ॲम्बेसेडर, स्मार्ट पिटी इंग्रजी मास्टर ट्रेनर, राजस्तरीय इंग्रजी मास्टर ट्रेनर, सपुपदेशक, आपत्ती व्यवस्थापन यशदा मास्टर ट्रेनर, शाळा सिद्धी असेसर, इंग्रजी शिक्षकांसाठी कार्यशाळा, आदी शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये प्रभावी कार्य केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मराठा मंदिर चे उपाध्यक्ष विलासराव देशमुख, उपाध्यक्ष दिपक देशमुख, मराठा मंदिर विद्यावर्धिनीचे अध्यक्ष योगेश पवार, सचिव मनोहर साळवी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, वटवृक्ष देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे आदीसह माजी विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले.
चौकट १)नूतन  मुख्याधापक योगेश पी. कबाडे- १३९ वर्षाची ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी दिनांक १/८/२०२६ पासून पदोन्नतीने रूजू झालो. मराठा मंदिर संस्थेने दिलेली ही नवीन जबाबदारी मी स्वीकारली असून प्रशालेच्या गतवैभव मध्ये भर घालण्यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्टा करीन याची मी हमी देतो. हजारो माजी विद्यार्थी व पालक यांच्या विश्वासाला राहून शाळेचा व संस्थेचा लौकिक वाढवेन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button