धार्मिक

अभिनेते सुनील गोडसेंचां श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सत्कार 

अक्कलकोट (प्रतिनिधी) 
कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मालिकेने नुकताच २००० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे.मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील गोडसे यांनी अक्कलकोट येथे स्वामींच्या चरणी हजेरी लावली. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास अभिनेते सुनील गोडसे यांनी भेट दिली.श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अधिपत्याखाली कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड अन्नदान सेवेचे यावेळी अभिनेते सुनील गोडसे यांनी कौतुक केले. श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अन्नदान सेवेचे कार्य हे अखंड आणि अविरतपणे सुरू आहे .स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादामुळेच हे शक्य आहे असे यावेळी सांगितले. या प्रसंगी अभिनेते सुनील गोडसे यांचा अन्नछत्र मंडळाचे पुरोहित संजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची प्रतिमा , कृपा वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी अभिनेते सुनील गोडसे यांच्या हस्ते उपस्थित स्वामी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.अक्कलकोटच्या पवित्र भूमीत महाआरती आणि महाप्रसादाच्या माध्यमातून हा आनंद साजरा करता आला,यापेक्षा मोठे समाधान नाही.यापुढेही स्वामींची सेवा अशीच घडत राहो,हीच त्यांच्या चरणी प्रार्थना व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button