परंडा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, सोमवारी बेमुदत सामूहिक रजेचा इशारा

परंडा / धाराशिव ( फारूक शेख ) : अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी जात असताना परंडा येथील तहसीलदार यांच्यावर कार्यालयाच्या आवारातच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीवर कडक कारवाईच्या मागणीसाठी परंडा तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आजपासून (दि. १६) दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३५ च्या सुमारास अवैध वाळू उत्खननाबाबत माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार कारवाईसाठी निघाले होते. यावेळी योगेश परमेश्वर मेटकरी (रा. पिठापुरी) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका इसमाने तहसील कार्यालयाच्या आवारातच तहसीलदारांची गाडी अडवली. योगेश परमेश्वर मेटकरी यांणी आरडाओरडा करत, शिवीगाळ करून गाडीच्या काचांवर प्रहार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तहसीलदारांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता, मेटकरी अंगावर धावून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
संबंधित आरोपी योगेश मेटकरी हा सराईत गुन्हेगार असून, त्याने दोन वर्षांपूर्वी बावची येथील तलाठी विकास नागटिळक यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला होता. त्याच्यावर अवैध गौण खनिज उत्खननाचे अनेक फौजदारी गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई होऊनही आरोपीच्या वर्तनात बदल होत नसल्याने महसूल प्रशासनात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या
या घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असून, भीतीपोटी काम करणे कठीण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. आरोपीला तातडीने अटक करून त्याच्यावर ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनाचे स्वरूप:
१६ व १७ एप्रिल: दोन दिवस पूर्णपणे कामबंद आंदोलन.
२० एप्रिल (सोमवार): आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास बेमुदत सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा.
या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाला असून, पोलीस प्रशासनाने आरोपीला तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे
यानिवेदनार
मा तहसीलदार निलेश काकडे .
नायब वहसीलदार पूजा गोरे .
नायब तहसीलदार विजय कुमार बाडकर . महीदपयवाद भाडकलंकर जाधव . खुने .सात पूते . धुमाळ . स्वामी . वाद्यमारे . अत्तार . व इतर महसूल कर्मच्यारी अधिकारी लिपिक कोतवाल .
इत्यादिच्या स्वाक्षऱ्या आहेत.



