सामाजिक

सह्याद्री आणि भीमाशंकर परिसरातील जंगलतोडीविरोधात नायब तहसीलदार यांना निवेदन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून निसर्ग, वनसंपदा आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सह्याद्री पर्वतरांगांतील व भीमाशंकर परिसरातील जंगलतोड तात्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी शिवयोग प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना शिवयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश  पवार यांनी, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये एक वृक्ष लावून निसर्गसंवर्धनाचा संदेश द्यावा, अशी विनंती केली. तसेच, भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असल्याने या पवित्र परिसरातील निसर्गाचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे मत व्यक्त केले.
या निवेदनाद्वारे आपल्या भावना व मागण्या लवकरात लवकर शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा, मागण्यांची दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी  शिवयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश  पवार, नगरसेवक तम्मा मामा शेळके, मदन राठोड, तुषार शिंदे, सुनील पाटील, अजय शिंदे, आकाश गडकरी, राजू पवार, रवी नारायनकर, बसू भोळे, रवी मंगरुळे, लक्ष्मण शिंदे, सचिन शिंदे, गणेश पवार, सुरेश कदम, मनोज गंगणे, विकास पवार, बालाजी जाधव, रविंद्र नाटकर, ज्योतिबा पवार, विशाल गरडे, सुधीर मोरे, शक्ती पांचाळ, स्वामीनाथ बेंद्रे आणि सागर जमादार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button