यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या दोन स्वयंसेवकांची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड
करमाळा- ( प्रतिनिधी )येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरच्या दोन स्वयंसेवकांची दिल्ली जवळी गंडपुरी, हरियाणा येथे राष्ट्रीय सेवा योजनाच्या राष्ट्रीय कार्यालयामार्फत राष्ट्रीय एकात्मत शिबिर 25 ऑक्टोबर 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या दरम्यान आयोजित करण्यात आले असून सदर शिबिरा करता महाराष्ट्र राज्यातून 4 युवक व 4 युवती सहभागी होत आहेत. यापैकी 2 युवक यशवंतराव चव्हाण महाविद्यालय कनिष्ठ विभागातील कुमार श्रेयस हर्षद शिंगाडे व कुमार समाधान बाबुराव टांगडे या 2 स्वयंसेवकांची निवड झालेले आहे.
सदर राष्ट्रीय एकात्मत शिबिरात युवा नेतृत्व संवाद , कला,भाषा व संस्कृती आदान- प्रदान , विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध बौद्धिक स्पर्धा व नामवंत व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा समावेश आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यामुळे या दोन युवकांची निवड झाली आहे. सदर शिबिरात महाराष्ट्र , कर्नाटक, गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, मिझोराम, दिल्ली, जम्मू-काश्मीर व पंजाब इत्यादी राज्यातील स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या स्वयंसेवकाची निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव विलासराव घुमरे , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने, प्रशासन अधिकारी . संभाजी किर्दाक यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी साठी राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख, प्राध्यापिका सौ.सुजाता भोरे ,प्रा. एम .डी. जाधव, प्रा. बी.एच. मस्कर यांनी मार्गदर्शन केले.




