शैक्षणिक

अक्कलकोटचे डॉ. धानय्या . कौटगीमठ यांची ८० वी परीक्षा उत्तीर्ण – उल्लेखनीय कामगिरी

 

अक्कलकोट : ( प्रतिनिधी ) येथील के. एल. ई. मंगरुळे हायस्कूल मधील शिक्षक डॉ. धनय्या जी. कौटगीमठ यांनी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) फेब्रुवारी २०२६ यशस्वीरित्या उत्तीर्ण करून आणखी एक यश आपल्या नावावर नोंदवले आहे.

ही परीक्षा दिनांक ८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. नुकताच जाहीर झालेल्या निकालानुसार, पेपर क्रमांक २ मध्ये त्यांनी १५० पैकी ९३ गुण मिळवत ६२ टक्के गुणांसह यश संपादन केले आहे.

विशेष म्हणजे, ही त्यांची ८० वी परीक्षा उत्तीर्ण होण्याची उल्लेखनीय कामगिरी असून त्यांनी सातत्य, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर एक प्रेरणादायी विक्रम प्रस्थापित केला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल KLE मंगरुळे हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. नंदाजी कदम, उपमुख्याध्यापक श्री. गिरीश पट्टे, पर्यवेक्षक सौ. आरती तोळनुरे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

डॉ. कौटगीमठ यांचे हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button