क्राईम

वैराग पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार १० हजाराची लाच घेताना अटकेत

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सोलापूर –
आपल्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यात तपासकामी मदत करतो असे सांगून १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदेष कृष्णदेव पवार (पो.ह.क्र. २१८०, नेम – वैराग पोलीस स्टेशन, सोलापूर ग्रामीण) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरच्या पथकाने अटक केली आहे.

या प्रकरणी सोलापूर ग्रामीणमधील वैराग पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४२२/२०२६ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*तक्रार अशी -* ३९ वर्षीय शेतकरी असलेल्या तक्रारदाराने दि. २८/०९/२०२६ रोजी ला.प्र.वि. सोलापूर कार्यालयास संपर्क केला होता. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये तपासकामी मदत करतो असे बोलून वैराग पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार संदेष पवार यांनी १,००,०००/- रु. ची मागणी केली. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर २०,०००/- रु. ची मागणी केली. परंतु तक्रारदाराने केलेल्या तडजोडीवरून शेवटी १०,०००/- रु. लाच मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली.

*पडताळणी -* पोलीस हवालदार संदेष पवार यांची दि. २८/०९/२०२६ रोजी वैराग पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे १३.४८ ते १५.३९ या कालावधीमध्ये पडताळणी करण्यात आली असून त्यावेळी त्यांनी तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी सुरुवातीस २०,०००/- रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती १०,०००/- रु. लाच मागणी केली आहे.

*सापळा -* आरोपीवर दि. २८/०९/२०२६ व दि. ०९/१०/२०२६ रोजी वैराग पोलीस स्टेशन येथे सापळा रचण्यात आला परंतु त्यांना तक्रारदार व पंचाबाबत संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली नाही.

त्यानंतर दि. २८/१०/२०२६ रोजी १४.०० वा. ताब्यात घेण्यात आलेले आहे.

ही कारवाई श्री प्रशांत चौगुले, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोहेकॉ/५५१ सलीम मुल्ला, पोहेकॉ/३० संतोष नरोटे, पोहेकॉ/१६१६ स्वामीराव जाधव, पोकॉ/९६६ गजानन किणगी, पोकॉ/८६२ राजू पवार, चालक पोकॉ/२०२६ अक्षय श्रीराम यांचा समावेश होता.

या कारवाईस श्री शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र आणि श्री अजित पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button