सोलापूर

उजनी धरणक्षेत्रात प्रस्तावित प्रकल्पांना विरोध करण्यासाठी ३१ ऑक्टोबरला आंदोलन

करमाळा ( प्रतिनिधी ) उजनी धरणक्षेत्रात प्रस्तावित असलेल्या ए. आय. डेटा सेन्टर, तरंगते सौर पॅनल, ग्रीन हायड्रोजन व लघु अणुऊर्जा इ. प्रकल्पांना विरोध करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी पुणे सोलापूर महामार्गावर रांजनी येथे आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे असे आवाहन ॲड. सविता शिंदे यांनी केले आहे.

अवर्षणप्रवण असलेल्या सोलापूर जिल्यातील बरेचसे शेतीचे क्षेत्र उजनी धरणामुळे बागायत होऊन शेतकऱ्यांना अलीकडेच बरे दिवस आलेले आहेत. तसेच बऱ्याच अंशी जिल्ह्याची तहानही उजनी।धरणामुळे भागत आहे. परंतु हे पाणीही पुरेसे नसताना सरकारने उजनी धरण परिसरात
ए. आय. डेटा सेन्टर, तरंगते सौर पॅनल, ग्रीन हायड्रोजन व लघु अणुऊर्जा प्रकल्पाचा घाट घातलेला आहे. या प्रकल्पांमुळे शेती, पाणी, पर्यावरण, रोजगार व सुरक्षितता या सर्वांवर दुष्परिणाम होणार आहेत. सरकारने पारदर्शकपणे याबाबत लोकांना माहिती दिलेली नाही. केवळ आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी व आंतरराष्ट्रीय दबावामुळे सरकार अनेक जनविरोधी प्रकल्प राबवत असून त्यांना कडाडून विरोध करून असे जनविरोधी प्रकल्प हाणून पाडले पाहिजेत. यासाठी गावोगावी जाऊन जनजागृती करत असून विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहेत ही सकारात्मक बाब आहे असेही ॲड. सविता शिंदे म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button