महाराष्ट्र

तेलगाव–माजलगाव रस्त्यावरील मृत्यूंच्या सत्राला जबाबदार कोण? आमदार साहेब, आता तरी लक्ष द्या !

 

नगरसेवक मतिन शेख – जनतेच्या जीवाची किंमत करा राजकारण करू नका ?

 माजलगाव ( नाजेर कुरेशी )
तेलगाव–माजलगाव रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. लोकांचे जीव धोक्यात असताना या रस्त्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना होणार तरी कधी ?
आमदार साहेब, जनतेला सांगा!
या रस्त्याची पाहणी कधी करणार?
अपघात रोखण्यासाठी ठोस उपाय कधी करणार?
नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी कधी मिळणार?
जनतेला भाषणे नकोत, आश्वासने नकोत; जनतेला सुरक्षित रस्ता हवा आहे!
आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जागे होऊन या रस्त्याच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आणखी किती जीव गेल्यानंतर कारवाई होणार आहे?
तेलगाव पालखी मार्ग माजलगाव रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवा! नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळु नका तेलगाव माजलगाव रस्ता खुप भयानक खराब झाला आहे,रोज कोनाचे तरी बळी जात आहे.प्रशासनाने तेलंगाव माजलगांव रस्ता मृत्यु चा मार्ग घोषित करावा नसता नविन रस्त्याचे काम चालु करावा अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button