क्राईम

सद्दाम आमलीचुंगे खून प्रकरणातील एकूण १५ आरोपी अटकेत

गुन्ह्यात वापरलेली वाहने व लोखंडी हत्यारे जप्त

सोलापूर – वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील वळसंग गावात दिनांक 09/09/2026 रोजी दोन गटांत वाद होऊन सद्दाम आमलीचुंगे यांना जबर मारहाण झाली होती. सदर मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना दिनांक 11/09/2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी वळसंग पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 556/2026, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 109(1), 118(1)(2), 115(2), 189(2), 190, 191(2)(3), 351(2)(3), 352, 324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी यासीन अब्बास कटरे, मोहसीन वजीर तांबोळी, बुडन कटरे यांच्यासह एकूण 15 आरोपींना वळसंग पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

तपासादरम्यान आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली एक इनोव्हा कार, एक महिंद्रा स्कॉर्पिओ, एक रिक्षा, तसेच लोखंडी रॉड, लोखंडी पाईप व इतर हत्यारे आरोपींकडून जप्त करण्यात आली आहेत.

सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी वळसंग पोलीस ठाण्याची तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी,  अपर पोलीस अधीक्षक  विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट  राजेंद्र टाकणे व सहायक पोलीस निरीक्षक  राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे हे करीत आहेत.

सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक कोळी, पोलीस हवालदार देवकर, मालचे, मियाँवाले तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद मांढरे व गजानन गायकवाड यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button