राजकीय
अक्कलकोट नगरीचा नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टीनी घेतला पदभार

उपनगराध्यक्षपदी ऋतुराज राठोड यांची निवड
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अकृकलकोट नगर पालिकेचा नगराध्यक्ष पदाचा पदभार भाजपाचे युवा नेते मिलन कल्याणशेट्टी यांनी मोठ्या थाटात भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करून घेतला. यावेळी उपनगराध्यक्षपदी भाजपाचे ऋतुराज राठोड यांची निवड ही मतदानाद्वारे करण्यात आली. तसेच स्विकृत सदस्यपदी अशोक जाधव , संजय घोडके ‘ प्रविण शहा यांची निवड झाली.
अक्कलकोट नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन सोमवार दि. १२ जानेवारी रोजी दुपारी करण्यात आले होते. या पदग्रहण कार्यक्रमात उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्याच्यां नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
प्रारंभी नुतन नगर सेवक सुनंदा स्वामी ‘ भिमराव उर्फ तम्मा शेळके ‘ कस्तुरा चौगुले, लक्ष्मीकांत धनशेट्टी मुस्तफा बळोरगी (कॉग्रेस) ‘ जहिराबी शेख ( काँग्रेस ) , अविनाश मडिखांबे , मंजना कामनुरकर ‘ रेणुका राठोड , रमेश कापसे , अपर्णा सिध्दे , यशवंत धोंगडे ‘ नाविद डांगे , अमृता शिंदे’ शैला स्वामी , महेश हिडोळे , स्नेहा खवळे , सद्दाम शेरीकर , सोनाली शिंदे , देवीदास कवटगी , सरिता कुर्ले (शिवसेना शिंदे गट ) महेश इंगळे , ऋतुराज राठोड , भागुबाई कुंभार , अल्फीया कोरबु या सर्व नगरसेवकांचा प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी व मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी उपनगराध्यक्ष पदाची निवडीचा कार्यक्रम झाला . ऋतुराज राठोड भाजपातर्फे व काँग्रेस कडून मुस्तफा बळोरगी उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता . अर्ज माघारी साठी दहा मिनीट वेळ देण्यात आला . कोणीही माघार घेतली नाही . हात वर करून मतदान घेण्यात आले . प्रथम मुस्ताफा बळोरगी यांच्या साठी हात ऊंच करून मतदान घेण्यात आले . त्यांना तीन मते मिळाली . भाजपाचे ऋतुराज राठोड यानां उपनगराध्यक्ष पदासाठी हात ऊंच करून २३ मतदारांनी मतदान केल्याने राठोड यांची निवड झाली .
स्विकृत सदस्य निवडीची प्रक्रिया झाली . या करिता तीन अर्ज प्राप्त झाली . संख्या बळानुसार भाजपाकडून प्राप्त तीन अर्जामधील शंकर जाधव ‘ संजय घोडके प्रविण शहा यांची अविरोध निवड झाली. या प्रसंगी बोलताना नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी मी जरी नगराध्यक्ष झालो तरी मी जनतेचा सेवकच आहे . अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास करिता अंग झटकुन सर्वाचे सहकार्याने काम करू. शासनाकडून मोठा निधी आणू अशी ग्वाही दिली .
तीर्थ क्षेत्र विकास अंतर्गत भुसंपादन साठी निधी यावा. अतिक्रमण काढताना कुणाचा हस्तक्षेप नसावा सर्व नगरसेवकांच्या व नागरिकांच्या सहकार्याने तीर्थक्षेत्र अक्कलकोटचा विकास होणार आहे असे मनोगत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी व्यक्त केले .
नगर सेवक महेश इंगळे यांनी मनोगत व्यक्त करताना तीर्थक्षेत्र विकास करताना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. याकरिता सर्वानी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मागे तीर्थक्षेत्र विकासाकरिता भक्कम पणे उभे राहू अशी ग्वाही दिली. नगर सेवक यशवंत धोंगडे यांनी अक्कलकोट शहरात निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत याबाबत सांगितले. नूतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, नूतन उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड व सर्वच सदस्याचां सत्कार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी , अमोलराजे भोसले , सागर कल्याणशेट्टी , शहाजी पवार ‘मल्लीनाथ कल्याणशेट्टी ‘ सिध्देश्वर कल्याणशेट्टी ‘ आनंद तानवडे ‘ दिलीप सिध्दे , मनोज कल्याणशेट्टी ‘शिवशरण जोजन ‘प्रदिप पाटील ‘ अप्पु बिराजदार , मोतीराम राठोड , सिद्धाराम टाके ‘ प्रभाकर मजगे , बाळा शिंदे , चंद्रकांत दसले , वरुण शेळके ,अभय खोबरे ‘ शैलेश राठोड उत्तम गायकवाड , नन्नू कोरबू , प्रकाश पाटील , शिवशरण वाले , मल्लिनाथ स्वामी, रमेश राठोड आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थिती होती .








