भैरवनाथ शुगर सोनारी कारखान्याचे सात लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट – चेअरमन आनिल सावंत

परंडा / धाराशिव ( फारुक शेख )परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या साखर कारखान्याने सात लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली.सन २०२५-२६ च्या अठराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा मंगळवार, १४ ऑक्टोबर रोजी कारखान्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोहळ्यात कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत, व्हाईस चेअरमन केशव उर्फ विक्रम सावंत, तसेच डिझेल पंप सुपरवायझर श्री व सौ. दाढे दाम्पत्य यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
चेअरमन अनिल सावंत यांनी सांगितले की, कारखान्याची मशिनरी पूर्ण कार्यक्षम स्थितीत आहे, ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा पूर्ण तयार आहेत आणि लवकरच गळीत हंगाम सुरू होणार आहे.
यंदा कारखान्याच्या परिसरात ऊसाचे क्षेत्र वाढले असून, भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मोळी पूजन होणार आहे. तसेच, ऊसाचा दर माजी आरोग्यमंत्री जाहीर करतील.
सोहळ्यास नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, वैभव पवार, सतिश मेहेर, हभप. रणभोर महाराज, शाम मोरे, ढगे महाराज,जनरल मॅनेजर प्रल्हाद ठोंबरे, डिस्टिलरी मॅनेजर अजित भोसले, चिफ केमिस्ट दादासाहेब बोरकर, चिफ इंजिनिअर रविकांत सिंग, कोजन मॅनेजर उदयशंकर गडगे, चिफ अकाउंटंट गोविंद कुलकर्णी, शेती अधिकारी भगवान काळे, बापूसाहेब देशमुख, कार्यालय अधिक्षक सोमनाथ सुर्यवंशी, म हादेव मुळीक, सुरक्षा अधिकारी जेजेराम सुर्यवंशी, स्टोअर किपर लांडगे, हेडटाईम किपर सुरेश साळुंके, ईडीपी मॅनेजर सुभाष भोसले, आबा अनवणे, भैरु गरदाडे यांच्यासह ऊस उत्पादक, सभासद शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.
सोहळ्याच्या माध्यमातून कारखान्याच्या उत्पादन तयारीची सांगता झाली आणि गळीत हंगामासाठी उत्साहजनक वातावरण तयार झाले.