Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आमदार रोहित पवार यांच्या जीवाला धोका, तातडीने z+ सुरक्षा पुरवण्याची राज्य सरकारकडे मागणी

Admin by Admin
February 22, 2026
in सोलापूर
0
आमदार रोहित पवार यांच्या जीवाला धोका,  तातडीने z+ सुरक्षा पुरवण्याची राज्य सरकारकडे मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर ( रमेश सुरवसे )राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण तडफदार नेतृत्व युवा आमदार रोहित पवार हे सध्या सातत्याने अजित दादा पवार यांच्या विमान दुर्घटने महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनात ज्या शंका आहेत त्या सातत्याने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलून दाखवत आहेत तसेच अजितदादा पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध प्रश्न उपस्थित करत आहेत सातत्याने त्या विरोधात आवाज उठवत आहेत. हि दुर्घटना नसून ही सूनियोजित हत्या असेल आणि महाराष्ट्राच्या एका उपमुख्यमंत्र्याची हत्या घडवून आणण्याची क्षमता असलेले लोक यामध्ये जर सहभागी असतील तर निश्चितच त्या लोकांकडून आमदार रोहित पवार यांच्याही जिविताला धोका निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार रोहित पवार यांना सरकारने तातडीने z+ सुरक्षा प्रदान करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे
आमदार रोहित पवार हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू असून, “सत्य बोलणाऱ्याचा आवाज दाबण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची शक्यता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आमदार रोहित पवार हे राज्याचे भविष्य आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पूर्णतः राज्य सरकारची आहे. त्यामुळे सदर मागणी आज सोलापुरात करण्यात आली असून तश्या आशयाचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी हा खूप संवेदनशील विषय आहे त्यामुळे याचे अधिकार माझ्या कडे नाहीत तुमचे निवेदन त्वरित राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल असे सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवा सेनेचे उपसचिव रणजीत बागल, डॉ योगेश रणदिवे, प्रशांत गायकवाड, मुसा आत्तार, अजित पात्रे, अमित मोतेवार, मिलिंद गोरे, मोहित निकम, अमरसिंह खांडेकर, युनुस अत्तार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मागणीचे प्रमुख मुद्दे -विमान दुर्घटनेची आंतरराष्ट्रीय एजन्सी कडून सखोल चौकशी करून दोषींना कडक शासन करावे,व्हीएसआर व्हेंचर्स (VSR Ventures) ही नवी दिल्लीस्थित एक खाजगी विमान वाहतूक कंपनी (charter operator) या दुर्घटनेत दोषी असून त्यावर त्वरित बंदी घालावी.

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना ही नम्रतेची विनंती करत आहोत की आमदार रोहितदादा पवार यांना तात्काळ झेड प्लस (Z+) सुरक्षा देण्यात यावी व त्यांच्यावरील संभाव्य धोका टाळण्यास मदत करावी ही नम्र विनंती.

लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधीला जर मोकळेपणाने बोलल्यामुळे जीवाला धोका निर्माण होत असेल, तर ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे.

Previous Post

रासकम.संघटनेच्या वतीने शिवरायांना अभिवादन

Next Post

करमाळा तालुका हमाल पंचायत च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

Admin

Admin

Next Post
करमाळा तालुका हमाल पंचायत च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

करमाळा तालुका हमाल पंचायत च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157521
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697