अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावर सही करून केंद्रातील भाजपा सरकारच्या प्रधानमंत्री मोदीने देशाला विकले , ठाकरे शिवसेनेचा आरोप

मुंबई –
अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावर सही करून केंद्रातील भाजपा सरकारच्या प्रधानमंत्री मोदीने देशाला विकले आहे, असा ठाकरे शिवसेनेने भाजपा सरकारवर गंभीर आरोप केला आहे. भाजपा पक्षाचे मोदी भारताचे प्रधानमंत्री आहेत की अमेरिकेचे सेल्स एजंट आहेत, असा ठाकरे सेनेचा भाजपा सरकारला प्रश्न केला आहे. अमेरिकेतील शेतकरी भारतीय शेतकऱ्यांचे रक्त शोषून आता मालामाल होईल. अमेरिकेतील शेतकऱ्यांचे हित प्रेसिडंट ट्रम्प यांनी पाहिले व अमेरिका ग्रेट बनवण्यासाठी त्यांनी भारताला गुलाम बनवले आहे. भाजपा सरकारच्या प्रधानमंत्री मोदींवर भयंकर दबाव आहे. मोदींनी एक क्षणही पदावर राहू नये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी व्यापार करार झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने देशात उत्सव सुरू केला आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी जग जिंकल्याच्या थाटात जाहीर केले की, भारताच्या १४० कोटी जनतेसाठी ही शानदार घोषणा आहे.
दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि मोठे लोकशाही देश एकत्र येतात तेव्हा लोकांचा फायदाच फायदा होतो. मोदी यांनी स्वतःच जाहीर केले की, भारत ही मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र १ तारखेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फुसका अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजार कोसळला होता. आणि भारतीय अर्थव्यवस्थेची हवा गेली होती, अशी ठाकरे शिवसेनेने देशातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. ज्या प्रेसिडंट ट्रम्प यांच्याशी व्यापार करार झाला त्या अमेरिकेच्या डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपया ९२ टक्के पर्यंत घसरला आहे. त्यावर केंद्रातील भाजपा सरकार व प्रधानमंत्री मोदी यांचे भक्त म्हणतात, इथे डॉलर्सची उठाठेव कशाला करता? भारतात काय डॉलरने व्यवहार होतो? भारतीय रुपयाचे इतके अवमूल्यन कधीच झाले नव्हते, पण प्रधानमंत्री मोदी व भाजपा सरकारचे लोक प्रेसिडंट ट्रम्प यांच्याशी व्यापार होत आहे या आनंदात मशगुल आहेत. प्रेसिडंट ट्रम्प हा प्रधानमंत्री मोदींचा नवा देव आहे का? अशी टीका ठाकरे शिवसेनेने केली आहे.
प्रत्यक्षात ट्रम्प यांनी भारताचा घात केला आहे. ट्रम्प यांच्याशी झालेला व्यापार करार म्हणजे देश अमेरिकेच्या पायाशी गहाण टाकल्याचा पुरावा आहे. प्रधानमंत्री मोदी प्रचंड घाबरले आहेत का? त्यांच्यावर प्रेसिडंट ट्रम्प यांचा प्रचंड दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावर सही करून केंद्रातील भाजपा सरकारच्या प्रधानमंत्री मोदींनी देशाला विकले आहे. भारताने आता अमेरिकेच्या सर्व अटी-शर्ती मान्य केल्या व त्या बदल्यात अमेरिकेने भारतावर लावलेले ५० टक्के टॅरिफ १८ टक्क्यांवर येईल. मुळात भारतावर आधी ३.३१ टक्के टॅरिफ होते, ते आता १८ टक्के झाले आहे. भारत यापुढे रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, तर फक्त अमेरिकेकडून तेल खरेदी करेल. अमेरिकेतून येणार्या कृषी उत्पादनांवर व अन्य मालांवर भारत टॅरिफ लावणार नाही. जवळ जवळ ‘शून्य’ टॅक्स असेल.
त्यामुळे भारत देशातील शेतकरी वर्ग संताप व्यक्त करत आहे. भारतीय शेतकर्यांचे हा सगळ्यात मोठे नुकसान आहे. प्रेसिडंट ट्रम्प यांनी प्रधानमंत्री मोदींचे नाव घेत सांगितले आहे की, भारत अमेरिकेकडून ५०० बिलियन डॉलर्सची तेल खरेदी करेल. कृषी उत्पादने, कोळसा, तंत्रज्ञानाची खरेदी विनाटॅक्स करेल. अमेरिकेबरोबरचा हा करार म्हणजे अमेरिकेला देशाचे सार्वभौमत्व विकल्यासारखेच आहे. अमेरिकेचा कापूस, दूध, दुधाचे पदार्थ, म्हणजे दही, चीज, डाळी, सोयाबीन, मका, बदाम, अक्रोड, पिस्ता, भाज्या, फळे, फुले वगैरे खुलेआम भारतीय बाजारात विक्रीस येतील. या विक्रीवर कोणताही टॅक्स नसल्याने भारतीय शेतकऱ्यांपेक्षा कमी भावात अमेरिकेचा माल विकला जाईल. मग भारतीय शेतकरी व शेतमजुरांनी काय करायचे? कसे जगायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारतातील अमेरिका कृषी व्यापार आधी ५० बिलियन अमेरिकी डॉलर होता. तो आता ५०० बिलियन डॉलर इतका होईल. भारतीय शेतकऱ्यांचे रक्त शोषण करून अमेरिकेतील शेतकऱ्यांना हा लाभ होईल आणि त्याला भारताच्या प्रधानमंत्री यांनी मान्यता दिली आहे. लाखो भारतीय शेतकरी, शेतमजूर यांचे याकरारात नुकसान होणार आहे. प्रधानमंत्री मोदी व भाजपा सरकारचे भक्त लोक या कराराचा विजय उत्सव साजरा करीत आहेत. भारत देशातील शेतकरी, छोटे उद्योजक, कुटीर उद्योजकांना रस्त्यावर आणणारा व्यापार करार आहे. प्रधानमोदी यांनी हा करार केला आहे, देशातील शेतकरी बांधवांना देशोघडीला लावणारा व्यापार करार केला आहे.केला. ज्या देशातला शेतकरी रोज कर्जात बुडून आत्महत्या करत आहे, त्या देशातले भाजपा सरकार व प्रधानमंत्री मोदी हे परदेशी कृषी उत्पादनांसाठी देशाचे नुकसान करत आहे.
अमेरिकेतील सबसिडीवाले स्वस्त व कुजके धान्य भारतात येईल व कृषी बाजारात आणले जाईल, प्रधानमंत्री मोदी आणि देशातील भाजपा सरकारने ही भारतीय शेतकऱी बांधवांशी मोठी बैईमानी केली आहे. प्रधनमंत्री मोदी व भाजपा सरकारने अमेरिकेशी केलेला हा व्यापार करार नाही तर, देशाच्या अन्नदात्याविरुद्ध केलेली युद्धाची घोषणा आहे. देशातील शेतकरी बांधवांनी व कष्टकऱी लोकांनी आता एकजूट होऊन त्याबद्दल देशातील भाजपा सरकारला व प्रधानमंत्री मोदी यांना जाब विचारावा लागेल की, भाजपा सरकारचे प्रधानमंत्री मोदी हे भारताचे प्रधानमंत्री आहेत की अमेरिकेचे सेल्स एजंट आहेत अशी ठाकरे शिवसेनेने केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे.



