Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

भारत-अमेरिका व्यापार करार शेतकरी व टेक्सटाइल्स उद्योगासाठी घातक; काँग्रेस उभी करणार मोठी लढाई – खासदार प्रणिती शिंदे

Admin by Admin
February 15, 2026
in देश - विदेश
0
डीपीडीसीमध्ये सुचविलेल्या कामांना मान्यता व निधी द्या ,खासदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली – नवी दिल्ली संसद भवन परिसरात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या करारामुळे देशातील शेतकरी आणि टेक्सटाइल्स उद्योगाचे प्रचंड नुकसान होणार असल्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला.

खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, अमेरिका-भारत व्यापार करारामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच इतर शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आयात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांनी काय करावे? देशात उत्पादित होणाऱ्या शेतीमालाचे काय होणार? बळीराजाच्या कष्टाला योग्य भाव मिळणार कसा? असे थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केले.हा करार म्हणजे देशातील शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम आहे. बळीराजाचे बळी घेण्याचे षडयंत्र भाजप सरकार राबवत आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. सोलापूरसह महाराष्ट्रातील टेक्सटाइल्स उद्योग आधीच अडचणीत असताना, या करारामुळे स्थानिक उद्योगांना मोठा फटका बसणार असून लाखो कामगारांच्या रोजगारावर गदा येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष देशातील शेतकरी, कामगार आणि लघुउद्योगांच्या हितासाठी मोठी लढाई उभी करणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

“देशहिताच्या नावाखाली जनविरोधी निर्णय घेणे थांबवावे. हा भारत-अमेरिका व्यापार करार शेतकरी आणि उद्योगविरोधी असल्याने तो रद्द केला गेला पाहिजे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.

तसेच, हा करार करण्यामागे एपस्टाईन, अदानी विषय कारणीभूत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नेमका कोणाचा दबाव होता? देशहितापेक्षा इतर कोणते स्वार्थ पुढे होते का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही थेट निशाणा साधला.

काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या आणि उद्योगांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा निर्धार व्यक्त करत खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला.

 

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉम्प्रमाइज झाले आहेत का? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे देशव्यापी आंदोलनासाठी काँग्रेस नेतृत्वाला पत्र!

Next Post

अग्निवीरला ‘आर्मी ऍक्ट’ लागू व्हावा; देशात दुसऱ्या ‘गोध्रा’ची भीती – ॲड. प्रकाश आंबेडकर

Admin

Admin

Next Post
तेलंगणात महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; प्रकाश आंबेडकरांचा आरएसएस वर घणाघाती हल्ला

अग्निवीरला 'आर्मी ऍक्ट' लागू व्हावा; देशात दुसऱ्या 'गोध्रा'ची भीती - ॲड. प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156514
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697