Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट येथे भव्य मिरवणूकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सांगता

Admin by Admin
February 22, 2026
in सामाजिक
0
अक्कलकोट येथे भव्य मिरवणूकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सांगता
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे सुरेशचंद्र सूर्यवंशी, अन्नछत्र मंडळाचे सचिव- शामराव मोरे, बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संयोजक अमोलराजे भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने शनिवारी शिव छत्रपतींच्या भव्य मिरवणूकीने जय भवानी…! जय शिवराय…!! च्या जयघोषात शिवजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत अमोलराजे भोसले मित्र मंडळाचे ८०० युवकांच्या लेझीम पथकाचा खेळ लक्षवेधी ठरले..! शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती.
दरम्यान सायंकाळी ६ वा. शिव छत्रपतींची भव्य मिरवणूक आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर जिल्हाप्रमुख- बाळासाहेबांची शिवसेना अमोलबापू शिंदे, नगरसेवक – सो. म.न.पा., राजन जाधव माजी सभापती परिवहन म.न.पा., सोलापूर, शहाजी पवार महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा, जि.प.सदस्य शिवराज म्हेत्रे, प्रवीण तानवडे, नगरसेवक तम्मा शेळके, प्रवीण शहा,  देविदास कवटगी, दिलीप सिद्धे, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, नन्नु लाला राठोड यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची विधिवत पूजन अप्पू पुजारी व सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पटनाणे करण्यात आले. सदराची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरील जुना राजवाडा समोरून कमलाराजे चौक, एवन चौक, नवा राजवाडा मार्गे, छ. शिवाजी महाराज चौक एस. टी. बसस्थानक, विजय कामगार चौक, कारंजा चौक, मेन रोड मार्गे, तूप चौक, फत्तेसिंह चौक ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
या मिरवणुकीस रामचंद्रराव घाटगे, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, विश्वस्त चंद्रकांत भाऊ कापसे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे, मैनुद्दीन कोरबू, सिद्धेश्वर मोरे, नन्नु कोरबू, सिद्धाराम टाके, शिवराज स्वामी, राम मातोळे, नागनाथ पाटील, पै. मौलाली शेख, बाळा शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत व सागर हिप्परगी, सोपानराव गोंडाळ, गणेश भोसले, मल्लिनाथ करपे, प्रा.भीमराव साठे, प्रा. सायबण्णा जाधव, प्रा.मनोज जगताप, शिवराज स्वामी, किरण जाधव, अनिल टोणपे, सिद्धेश्वर जाधव, विराज माणिकशेट्टी, संजय बडवे, बालाजी जाधव, श्रीशैल कुंभार, दिपक जरीपटके, दत्तात्रय बाबर, रुद्रय्या स्वामी, सातय्या स्वामी, सुनील खवळे, सायबण्णा हरवाळकर, अॅड. अनिल पाटील, रोहित खोबरे, पप्पू कोल्हे, चेतन जाधव, संतोष जाधव, सुनील पवार, सागर गोंडाळ, गोविंदराव शिंदे, रमेश शिंदे, महादेव बिराजदार, अश्पाकभाई कझी, किरण पाटील, बाळासाहेब घाटगे, रवी कदम, शिवा मंगरुळे, लक्ष्मण विभूते, चंद्रकांत कुंभार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष माने, समर्थ घाटगे, ओंकार दुरुगकर, अभिषेक चव्हाण, लक्ष्मण शिंदे, शुभम कुलाल, अभिषेक सूर्यवंशी, केदार तोडकर, निखील शिंदे, अमित कोळी, विनायक भोसले, शरद भोसले, सुराज्य घाडगे, किरण साठे, युवराज सोनटक्के, दत्ता माने, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, अनिल बिराजदार, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, शुभम चव्हाण, विठ्ठल रेड्डी शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक संपन्न झाली. निघालेल्या मिरवणुकीचे विविध सामाजिक संघटना व पक्षाने स्वागत केले. मिरवणूक यशस्वीसाठी अमोलराजे भोसले मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले.
याप्रसंगी शिवजन्मोत्सव अध्यक्ष – आकाश शिंदे, उपाध्यक्ष – योगेश पवार, सचिव- सुमित घाटगे, श्रीधर गुरव, खजिनदार – शितल फुटाणे-जाधव तर कार्याध्यक्ष –विशाल कलबुर्गी, राजू पवार, फहिम पिरजादे, आकाश सूर्यवंशी मिरवणूक प्रमुख- संतोष भोसले, बाळासाहेब पोळ, प्रवीण घाडगे, निखील पाटील, गोटू माने, सनी सोनटक्के, सागर सोमवंशी लेझीम संघ व्यवस्थापक- वैभव मोरे, योगेश पवार, प्रथमेश पवार, मंगेश सूर्यवंशी, अमित घाटगे शिवजयंती स्टेज व मिरवणूक ट्रॉली सजावट प्रमुख- राहुल मोरे, वैभव कामनुरकर, समर्थ घाटगे, अनंत क्षीरसागर व्यवस्थापक- मनोज निकम, राजाभाऊ नवले, नितीन शिंदे, सौरभ मोरे, रोहित खोबरे, संजय गोंडाळ सत्कार प्रमुख- अशिष हुंबे, प्रशांत कडबगावकर प्रसिद्धी प्रमुख- प्रशांत भगरे, प्रवीण देशमुख, सोमशेखर जमशेट्टी, शंभूलिंग अकतनाळ, मिडिया प्रमुख अतिश पवार यांच्यासह आदिजन उपस्थित होते.
Previous Post

करमाळा तालुका हमाल पंचायत च्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

Next Post

अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा!! माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रत द्वितीय क्रमांक

Admin

Admin

Next Post
अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा!! माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रत द्वितीय क्रमांक

अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा!! माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रत द्वितीय क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157241
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697