महाराष्ट्र

राज्यात शिक्षणक्षेत्राचे धिंडवडे, राज्यातील १ हजार १६४ शाळांमध्ये अजुनही स्वतंत्र शौचालये, वीज सूविधा नाही

शिक्षण विभाग सांख्यिकी अहवाल
मुंबई –
राज्यात शिक्षणक्षेत्राचे धिंडवडे, निघत आहे, तर राज्यातील ११६४ शाळांमध्ये अजुनही स्वतंत्र शौचालये, वीज सूविधा नाही, असे राज्यातील शिक्षण विभागाच्या सांख्यिकी अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्रातील हजारो शाळांमधील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यातील सरकारने लाडक्या बहिणींचा विचार केला आहे, तर राज्यातील लाडक्या लेकींचे प्रश्न कधी सुटणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज ही राज्यातील अनेक भागांतील शाळांमध्ये , राज्यातील अनेक जिल्ह्यात शाळांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळेतील मूलामूलींसाठी स्वतंत्र शौचालये नाहीत, आणि आजही अनेक शाळांमध्ये लाईटची व्यवस्था नाही. राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी यावर्षीच्या भाजपा सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.
जगभरातील देशात शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठी पावले उचलली जात आहेत. भारतात मात्र शिक्षणव्यवस्थेवर सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. हे वास्तव आता समोर येत आहे. म्हणून केंद्रच नव्हे तर राज्य शासनाकडूनही अनेकदा काही महत्त्वाची पावले उचलली जाण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्यात मात्र याच शिक्षण क्षेत्राचे भयानक वास्तव नुकतेच समोर आले आहे. महाराष्ट्रात एकिकडे राज्य विकासाच्या दिशेने पावलेटाकत आहे. तर राज्यात अजुनही शिक्षणाचा मुद्दा आणि त्यातही ज्ञानार्जनासाठी जाणाऱ्या शिक्षण घेत असलेल्या शाळांमधील मूलामूलींना , विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांबाबत मात्र राज्य मागे आहे.राज्यात अजुनही अनेक जिल्ह्यात मूलामूलींना शिक्षणाची व्यवस्थित सेवासुविधा उपलब्ध होत नाही. काही ठिकाणी अजुन शाळांमध्ये लाईट सुविधा नाही. राज्यातील काही भागांत शाळामधील मूलामूलींसाठी वेगवेगळे स्वतंत्र शौचालय नाही, असे राज्यातील शिक्षण विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
राज्यातील शाळांमध्ये अनेक सेवासुविधा उपलब्ध होत नसल्यामूळे शाळेतील मूलांची अजुनही मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सध्याची वास्तव परिस्थिती, अनेक शाळांची वस्तूस्थिती व राज्यातील शाळांचे भ्यानक वास्तव समोर आले आहे. राज्यातील शिक्षण अहवालात राज्यातील अनेक शाळाचे वास्तव समोर आले आहे. राज्यातील ११६४ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची सोय नाही. तर, ३३२८ शाळांमध्ये वीजपुरवठा नसल्याचीही बाब उघड करण्यात आली आहे. राज्यातील शिक्षण विभागाच्या सांख्यिकी अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालये उपलब्ध नाही. राज्यातील  १०४३ शासकीय शाळा, ६४ खासगी अनुदानित शाळा, २० खासगी विनाअनुदानित शाळा आणि ३७ सेल्फ फायनान्स अशा राज्यातील एकुण ११६४ शाळांमध्ये मूलींसाठी स्वतंत्र शौचालये अजुनही बांधलेली नाही असे शिक्षण अहवालात म्हटले आहे.
माहितीनुसार  २०२४ – २०२६ या काळातील राज्यातील शिक्षण विभागाचा हा अहवाल जानेवारी २०२६  या महिन्यात राज्यातील शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना सादर करण्यात आला आहे. त्यातून राज्यातील  ११६४ शाळांमधील हे भ्यानका वास्तव समोर आले आहे. शिक्षण अहवालानुसार मुलींसाठी स्वतंत्र शौचालये नसलेल्या सर्वाधिक शाळा बीड जिल्ह्यात आहेत. बीड जिल्ह्यात शौचालये नसलेल्या शाळा आहेत. एकुण आकडेवारी ११२ आहे. तर राज्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, गडचिरोली, जळगाव, अमरावती, नाशिक मध्येही शौचालये नसलेल्या काही शाळा आहेत. तर, राज्यातील मुंबई, गोंदिया, कोल्हापूर, सातारा आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मात्र मुलींसाठी स्वतंत्र शौचालयांची १०० टक्के सुविधा आहे असे या शिक्षण अहवालात म्हटले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळांमध्ये मूलींसाठी स्वतंत्र शौचालये नाहीत आणि स्वतंत्र वीजपुरवठाही नाही. राज्यात वीजपुरवठा नसलेल्या शाळांमध्ये राज्यात शासकीय ३१०२शाळा आहेत. तर  १३१ खासगी अनुदानित, १९ विनाअनुदानित आणि ७६ सेल्फ फायनान्स शाळांचा आहेत. राज्यातील उच्चस्तरीय बैठकीत शाळांमधील सुविधांबाबतचा हा तपशील पाण्यात आला आहे. राज्यातील शाळांतील सेवा सुविधांच्या कमतरतेबाबतचा येत्या महिनाभरात राज्यातील संबंधित शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची व्यवस्था केली जाईल, असे राज्यातील शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल यांनी दिली आहे. राज्यातील शिक्षण विभागाच्या सांख्यिकी अहवालामूळे राज्यातील, अनेक जिल्ह्यातील शाळांची भयानक वास्तव परिस्थिती उघडकीस आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button