आरोपींना अटक करा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार – राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे

मुंबई -महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष तथा दै. विदर्भ मतदारचे पत्रकार नयन मोंढे यांनी दैनिकात प्रसिध्द केलेल्या वृत्तावरुन त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ला करणार्यांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई होणेसाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना याबाबतीत निवेदन देण्यात आले. तसेच या हल्ल्याविरोधात गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करुन अटक करा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष तथा दैनिक विदर्भ मतदार पत्रकार नवीन मोंढे यांनी 14 ऑक्टोंबर रोजी पंचशील नगरात बाल गुन्हेगारांचा धुमाकूळ ही बातमी छापल्यामुळे त्यांच्या घरावर वरली मटका चालक बाबू शेंडे याने रात्रीच्या सुमारास आधी घरामध्ये सुतळी बॉम्ब फेकला जे मारण्याचे धमकी देऊन अशलील शिवीगाळ केली.
या घटनेची तक्रार नयन मोंढे पोलीस स्टेशनला देण्याकरीता गेले असता वरली मटका चालक बाबू शेंडे हा नयन मोंढे यांच्या घरावर त्याच्या तीन-चार साथीदारांसह हातात पाईप घेऊन आला. घरातील महिलांना अशलील शिवीगाळ करण्यात आली. मटका चालक बाबू शेंडे या समाजकटंक गुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली. तसेच गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करुन कारवाई करावी अन्यथा राज्यभर आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमणी, सोशल मिडीया प्र.अध्यक्ष सिध्दार्थ भोकरे, प्रदेश प्रसिध्द प्रमुख नवनाथ जाधव, संपर्क प्रमुख वैभव स्वामी, इले. मिडीया प्र.अध्यक्ष अतुल परदेशी, अमितकुमार खाडे, रुपेश पाडमुख, रमेश डोंगरे, संदिप भटेवरा, अॅड. रचना भालके आदींसह पत्रकार संघाचे राज्यभरातील पदाधिकारी यांनी दिला आहे.