सोलापूर

रासकम.संघटनेच्या वतीने शिवरायांना अभिवादन

 सोलापूर: ( रमेश सुरवसे ) धर्म निरपेक्ष रयतेचे राजे, कुळवाडी भूषण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जन्मोत्सव दिनानिमित्त शिवाजी चौक, सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने रासकम. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजयकुमार भांगे आणि जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.यावेळी डावीकडून असलेले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या लिपिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डी.एन गायकवाड, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील बोलाबत्तीन, भीमराव लोखंडे, प्रविण वाघमारे, प्रभाकर माने, व्ही एम पटेल, निमंत्रक बाळकृष्ण पुतळे, सहसचिव ए.आर.रंगरेज, मध्यभागी कार्याध्यक्ष सी.एस.स्वामी, जिल्हा अध्यक्ष विजयकुमार भांगे, प्रमुख संघटक आशुतोष नाटकर, ज्येष्ठ सल्लागार नामदेव थोरात, जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे, कार्यालयीन सचिव सटवाजी होटकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष भिमराव लोखंडे, प्रवीण वाघमारे, मुश्ताक पटेल, कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर, प्रभाकर होनकळस,यांच्यासह रासकम संघटनेमधील तसेच अनेक खातेनिहाय संघटनेचे पदाधिकारी तसेच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button