सामाजिक
अतिवृष्टी पावसाने झालेल्या खरीप पिकांचे प्रती हेक्टर ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांची मागणी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) :- राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुका यांच्या वतीने अक्कलकोटचे निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड साहेब यांना गेल्या आठवड्यात झालेल्या अतीवृष्टी पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे पंचनामा करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबतीत निवेदन देताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, अक्कलकोट शहर अध्यक्ष निलेश लवटे, अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष शिंदे, अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष रेवणसिध्द शेरी,वाहतूक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष बिरप्पा मैंदर्गी, बादोल्याचे माजी सरपंच गौरीशंकर गायकवाड, अमित माडेकर, अशोक देवकर, प्रमोद देवकर, अनिल सरवदे, धुळबा काळे, सिध्दू नकाशे, म्हाळप्पा पुजारी, सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, अक्कलकोट तालुक्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिक तुर,मुग, सोयाबीन, मका, सूर्यफूल, भुईमूग, कांदा आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला पिके जळून जात आहेत. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून आपल्या शेतात पेरणी केली आहे. मात्र सतत पाऊस जास्त असल्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनास विनंती आहे की गाव कामगार तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडे त्वरीत सादर करावे व अक्कलकोट तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी जर शासनाकडून मदत न मिळाल्यास पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे घटना वाढणार आहे. तरी आपण या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले आहे.




