शैक्षणिक

शिक्षणमहर्षी कै. शिवशरण खेडगी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

‘शिव-शरण अक्कलकोट भूषण’ पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन, दानशूर शिक्षणमहर्षी कै. शिवशरण चन्नबसप्पा खेडगी (मामा) यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त चेअरमन बसलिंगप्पा खेडगी मित्र परिवारच्या वतीने शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सी.बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूल च्या सभा मंडपात विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ‘शिव-शरण अक्कलकोट भूषण’ पुरस्कार वितरण सोहळासह वृक्षारोपण, रक्तदान, विविध आरोग्य तपासणी शिबिरे, गुणवंत विद्यार्थी सत्कार, गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप आयोजित करण्यात आले असल्याची माहिती चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी १० वाजता वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर रक्तदान शिबिर, बाल आरोग्य तपासणी, दंत तपासणी, नेत्र तपासणी व चष्मे वाटप यांसारखे उपक्रम होणार आहेत. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता ‘शिव-शरण अक्कलकोट भूषण’ पुरस्कार सोहळ्यात आरोग्य, शिक्षण, समाजसेवा, प्रशासन, उद्योग, कृषी, बँकिंग, पोलिस सेवा आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा सोहळा  मान्यवराच्यां उपस्थितीत  संपन्न होणार असून अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी परिवारातील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे.   
तरी शहर व तालुक्यातील नागरिक व महिलांसह पालक आणि आजी – माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
               
चौकट —
यांचा होणार सन्मान –
डॉ. योगेश वेळापूरकर ( आरोग्य ), डॉ. शिवराया अडवीतोट व एम. बी. पाटील ( शिक्षण ), संतोष बिराजदार (प्रशासकीय), सुरेश डिग्गे (समाज), अनिल हत्ते (संरक्षण ), वनिता तंबाके (बचत गट), विद्याधर गुरव (उद्योग व्यवसाय ), शशिकांत हत्तुरे (कृषी), शशिकांत  स्वामी (बँकिंग), अश्पाक मोमीन (पोलीस), भीमाशंकर कुंभार ( उद्योजक्ता ) आणि खेडगी महाविद्यालयातील प्रा.जयश्री बिराजदार, प्रा. निलप्पा भरमशेट्टी, प्रशासकीय सुहास होटकर, शिक्षकेतर कर्मचारी बाबुराव बोलदे इत्यादी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button