शैक्षणिक

धानय्या कौन्टगी यांना पीएच. डी. प्रदान     

    
अक्कलकोट ( प्रतिनिधी )    अक्कलकोट येथील मंगरुळे प्रशालेत इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे  धानय्या गुरूलिंगय्या कौन्टगी यांना नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे इंग्रजी विषयात पीएच. डी. प्रदान करण्यात आली.
      धानय्या कौन्टगी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या शुभहस्ते पीएच. डी. चे नोटिफिकेशन वितरित करण्यात आले.  धानय्या कौन्टगी यांना या संशोधन कार्यासाठी डी. बी. एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. तानाजी कोळेकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.यावेळी प्रा. प्रकाश सुरवसे, डॉ. शिवाजी शिंदे यांची उपस्थिती होती.
धानय्या यांच्या मौखिक परीक्षेसाठी बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. मुस्तजीब खान, अध्यक्ष म्हणून डॉ. दीपक ननवरे, डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेज सोलापूर यांची उपस्थिती होती.
         धानय्या कौन्टगी यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरील बहुतांश राज्याची इंग्रजी विषयाची नेट, सेट, गेट आणि पेट ही परीक्षा तब्बल ७९ वेळा उत्तीर्ण होऊन एक महाविक्रम आपल्या नावावर स्थापित केला आहे. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
     अतिशय कष्टाने आणि मेहनतीने त्यांनी ही पदवी संपादन केली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार  महांतेश कवटगीमठ, के. एल. ई. चे सदस्य व शालेय समितीचे अध्यक्ष  अनिल पट्टेद,  सदस्य महादेव बळीगार, अण्णाप्पा काडादी प्रशालेचे मुख्याध्यापक  अनिल पाटील, शालेय समिती सदस्य ऍड. अनिल मंगरुळे, मंगरुळे प्रशालेचे मुख्याध्यापक  नंदाजी कदम, उपमुख्याध्यापक  जी. बी. पट्टेद, पर्यवेक्षक . आरती तोळनुरे, प्रशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी  धानय्या कौन्टगी यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button