Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक  कार्यक्रम दि. १९ जुलै ते २८ जुलै २०२६ पर्यंत आयोजन

Admin by Admin
July 6, 2026
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक  कार्यक्रम दि. १९ जुलै ते २८ जुलै २०२६ पर्यंत आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
        १९८८ पासून श्री स्वामी समर्थांचे अन्नदानाचे कार्य करीत व सामजिक बांधिलकी जपत सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक,पर्यावरणकारक, क्रीडाविषयक कार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (प.ट्र.नं.एफ-२२७९), अक्कलकोट हे धर्मादाय न्यास संस्थापक अध्यक्ष सन्मा. श्री जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व न्यासाचे सन्मा. कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबध्द मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनिय व नेत्रदीपक प्रगतीची वाटचाल करीत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. १९ जुलै ते २८ जुलै २०२६ पर्यंत आयोजन करण्यात आल्याची माहिती न्यासाचे सचिव शामराव मोरे काका यांनी पत्रकारांना दिली आहे.
       दि. १९ जुलै रोजी रविवार सायंकाळी ६.३० मिनीटानी कार्यक्रमास प्रारंभ होणार असून, अक्कलकोट विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी, प.पू.श्री मोहन पुजारी – मुख्य पुजारी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, वे.शा.सं.श्री अण्णू महाराज –पुजारी श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, तहसिलदार विनायक मगर, अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थाचे प्रतिमाचे पूजन, दिप प्रज्वलनाने सदर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 
दि. १९ जुलै रोजी रविवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत “ *रंग उषेचे”* , सादरकर्ते जेष्ठ ख्यातनाम गायिका उषाताई मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. 
दि. २० जुलै रोजी सोमवार सायंकाळी ७.३० ते रात्रौ ९.३० पर्यंत, “ *संगीत संजे* ” सादरकर्ते – ख्यातनाम कन्नड गायक राजेश कृष्णन आणि सहकारी, बेंगलुरू हा कन्नड कार्यक्रम होणार आहे. 
दि. २१ जुलै रोजी मंगळवार सायंकाळी ७.१५ ते रात्रौ ९.३० पर्यंत ख्यातनाम व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे-पाटील यांचे ‘ *छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान* सादर होणार आहे. 
दि. २२ जुलै रोजी बुधवार सायंकाळी ७.१५ ते रात्रौ ९.३० पर्यंत “ *स्वर आर्या* ” सादरकर्ते आर्या आंबेकर आणि सहकारी, मुंबई कार्यक्रम सादर होणार आहे.  
दि. २३ जुलै रोजी गुरुवार सायंकाळी ७.१५ ते रात्रौ ९.३० पर्यंत “ *फोक आख्यान* ” निर्मिती, मूळ संकल्पना, संगीत कारभारी: हर्ष – विजय लेखन, दिग्दर्शन, गीते आणि लमानबंधू : ईश्वर अंधारे निर्मिती : रणजीत गुगळे आणि भूषण मेहरे यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
दि. २४ जुलै रोजी शुक्रवार सायंकाळी ७.३० ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘ *किर्तन’* राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांचा कार्यक्रम होणार आहे. 
दि. २५ जुलै रोजी शनिवार सायंकाळी ७.१५ ते रात्रौ ९.३० पर्यंत “ *श्रीमंत दामोदरपंत* ” भरत जाधव एन्टरटेन्मेंट निर्मित मराठी नाटक लेखकम दिग्दर्शक केदार शिंदे यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. 
दि. २६ जुलै रोजी रविवार पहाटे ५.३० ते ९.३० वा पर्यंत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), व चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आरोग्य ते अध्यात्म” हा प्रेरणादायी संदेश देणारी ही “ *भक्ती रन” स्पर्धा* रविवार दि. २६ जुलै २०२६ रोजी अक्कलकोटच्या पावन भूमीत आयोजित करण्यात आली असून, शारीरिक तंदुरुस्ती, अध्यात्मिक उन्नती आणि भक्तीमय वातावरणाचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळणार आहे. या भव्य “अक्कलकोट 10K भक्ती रन” या आगळ्यावेगळ्या मॅरेथॉन स्पर्धेच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंकचे उद्घाटन  जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले होते.
मॅरेथॉनच्या अधिकृत ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ करत रजिस्ट्रेशन लिंकचे लोकार्पण करण्यात आले. राज्यभरातील धावपटूंना या भव्य “भक्ती रन” मध्ये सहभागी होण्यासाठी अधिकृतपणे नोंदणी करता येणार असून, यामध्ये  ३ कि.मी., ५ कि.मी. आणि १० कि.मी. अशा विविध गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी धावपटूंना बिब, टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र, आकर्षक बक्षिसे, मेडिकल सपोर्ट, पौष्टिक नाश्ता तसेच उत्साहपूर्ण वातावरणाचा अनुभव मिळणार आहे.भक्ती, फिटनेस आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम घडवणारा हा उपक्रम राज्यभरातील धावपटू, क्रीडाप्रेमी आणि स्वामी भक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे.
दि. २६ जुलै रोजी रविवार सायंकाळी ७.१५ ते रात्रौ ९.३० पर्यंत आदेश बांदेकर प्रस्तुत ‘ *खेळ मांडियेला* ’ खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी हा कार्यक्रम होणार आहे. 
दि. २७ जुलै रोजी सोमवार सायंकाळी ७.१५ ते रात्रौ ९.३० पर्यंत नृत्य अविष्कार “ *संभवामि युगे युगे* ” संकल्पना, नृत्य व दिग्दर्शन – संस्कृती बालगुडे, पुणे यांचा कार्यक्रम सादर होणार आहे.  
दि. २८ जुलै रोजी मंगळवार सायंकाळी ७.३० ते रात्रौ ९.३० पर्यंत श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘ सुर भक्तीचे उमटले ’ भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे. 
गुरुपौर्णिमा दिन – दि. २९ जुलै –
दि. २९ जुलै रोजी गुरूपौर्णिमे निमित्त बुधवार सकाळी ७ ते ९ पर्यंत महाप्रसादगृह येथे श्री स्वामी समर्थ चरित्र  सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वा. खालील मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानवैद्य दाखविण्यात येणार आहे. यांच्या हस्ते- केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्य मंत्री ना. मुरलीधर  मोहळ, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना. जयकुमार गोरे, राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री ना. भरतशेठ गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, सी.ए. महेश गावस्कर, पुणे,  अखिल मंडई मंडळ पुणेचे अध्यक्ष व न्यासाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, सचिन सांबरेकर पालखी परिक्रमा संयोजक बेळगावी, ललिताताई वीर आगासखिंड नाशिक देणगीदार, यांच्या हस्ते आणि अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
महानैवेद्य व आरतीनंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट संचलित अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमी उदघाटन प्रमुख उपस्थिती चंद्रकांत पंडित, मा.भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक व समीर दिघे मा.भारतीय क्रिकेटपटू  हे असणार आहेत. सदरचा उदघाटन सोहळा हा गट नं. ५८१, नवीन वाहनतळ, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे होणार आहे.
Previous Post

‘नागरिक गुलाम नाहीत’ : मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Next Post

आळंदीत इंद्रायणीला महापूर ! प्रशासनाचा इशारा

Admin

Admin

Next Post
आळंदीत इंद्रायणीला महापूर ! प्रशासनाचा इशारा

आळंदीत इंद्रायणीला महापूर ! प्रशासनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697