सामाजिक

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पत्रिकेचे पुजन

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. १९ जुलै ते २८ जुलै २०२६ पर्यंत न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रम पत्रिकेचे पूजन शनिवारी संपन्न झाले.
दरम्यान पत्रिका पूजन न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे काका, विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने व विधिवत पूजनाने सदरचे पत्रिका पूजन संपन्न झाले. यावेळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, समाधी मठ, न्यासाच्या परिसरात असलेल्या तुळजाभवानी माता मंदिर, श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर येथे देखील ठेऊन पत्रिका पूजन करण्या आले.
१९८८ पासून श्री स्वामी समर्थांचे अन्नदानाचे कार्य करीत व सामजिक बांधिलकी जपत सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक,पर्यावरणकारक, क्रीडाविषयक कार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे धर्मादाय न्यास संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील धार्मिक क्षेत्रात उल्लेखनिय व नेत्रदीपक प्रगतीची वाटचाल करीत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ वा. वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक हे कार्यक्रम दि. १९ जुलै ते २८ जुलै २०२६ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी शहाजी यादव, बाळासाहेब घाटगे, सतीश महिंद्रकर, स्वामिनाथ बाबर, दत्ता मोरे, दत्ता माने, शुभम सावंत, सतीश महिंद्रकर, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button