सामाजिक

अक्कलकोट ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी

अक्कलकोट: ( प्रतिनिधी ) अक्कलकोट येथे  ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त माणिक पेठ जमात (सिरत कमिटी अक्कलकोट) कडुन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अक्कलकोट शहरातील माणिक पेठ येथुन सकाळी ९ वाजता भव्य जुलुस(मिरवणूक) काढण्यात आली.
या जुलूस मध्ये अक्कलकोट सह अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. ठिकठिकाणी विविध मुस्लिम बांधव मित्र परिवाराकडून मिठाई,शरबत, ज्यूस,सुगंधी दूध, व पाणी वाटप करण्यात आले. सदर रॅली माणिक पेठ ईदगहा येथुन निघुन शहरातील मुख्य मार्गावरून कारंजा चौक,आरिफ शेरीकर चौक , वीर सावरकर चौक सेंट्रल चौक, फतेसिंह चौक,नाईकवाड गल्ली, रजिअल्लाह टेक,ए वन चौक,बस स्टॅन्ड,हन्नूर चौक,बुधवार पेठ येथुन फिरुन या जुलूसचा समारोप माणिक पेठ ईदगहा मैदानावर झाला.
या रॅली मध्ये लहान मुले,तरूण,तसेच वयोवृद्ध माणसे  तसेच चारचाकी वाहने,दुचाकी,या रॅलीत सहभागी  होते,यावेळी तरुणाई मध्ये व लहान मुला मुली मध्ये ईद-ए-मिलादू-नबी च्या जुलूस मध्ये उत्साह पाहवयास मिळाला.
या वेळी माणिक पेठ ईदगहा येथै सलाम,दुवा दाता पीर साहेब यांच्या हस्ते करण्यात आली,  रिक्षा सजावट केलेल्यांना पारितोषक  देण्यात आले.
  जुलूस मध्ये सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था ही सिरत कमिटी माणिक पेठ जमाततर्फे करण्यात आली होती.
तसेच कारंजा चौक येथे  नगरसेवक   मित्रपरिवार ग्रुप तर्फे रिक्षा सजावट करण्यात आलेल्यांना पारितोषिक देण्यात आले.
प्रथम पारितोषिक (मक्का मदिना) मौलाली गल्ली 
मुख्तार शेख यांना देण्यात आले.
संध्याकाळी ७ वाजत आरिफ शेरीकर चौक येथे माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर व एस एस सोशल ग्रुप मिञ परिवार यांच्या तर्फे ईद-ए-मीलादुनबी निमित्त काडण्यात आलेल्या रिक्षा सजावट करण्यात आलेल्याना परितोषिक देण्यात आले.
चौकट –
यंदाच्या वर्षी गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादूनबी एकाच दिवशी होती म्हणून हिंदु-मुस्लिम  दोघांसाठी 16 सप्टेंबर दिवस महत्त्वाचा होता. परंतु १०व्या दिवशी अनंत  चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक निघतात मोठ्या संख्येने भावीक रस्त्यावर उतरतात शहरात विसर्जनाचा मोठा उत्साह असतो मोठी गर्दी रस्त्यावर असते.(गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद एकच मार्ग असल्याकारणाने)
ही बाब लक्षात घेऊन माणिक पेठ सिरत कमिटी कडून हिंदू मुस्लिम सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून ईद-ए-मिलादुन्नबी १६ सप्टेंबर ऐवजी १९ सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला.
सोहेल फरास अक्कलकोट
या जुलूस मध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, अशपाक बलोरगी, दाता पीर साहेब, पिरजादे साहेब आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button